मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूकीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे 70 दिवसापेक्षा अधिक काळ, ऑटो रिक्षा, कार पार्कीगमध्ये उभ्या होत्या. लॉकडाऊन शिथील होताच आपली वाहने काढण्यासाठी मुंबईकर उत्सुक होते. मात्र, त्यांना आता वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने गाड्या जागीच उभ्या असल्याने अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या आहे.
या काळात डिझेल, सीएनजीचे वाहनामध्ये बॅटरी बंद, ब्रेक जाम, दरवाजे न खुलणे, खिडकीच्या समस्या आणि चाक बसण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळाही तोंडावर आहे. त्यामुळे आपापली वाहने दुरस्त करण्यासाठी अनेकांनी सर्व्हिसिंग सेंटरकडे धाव घेतली आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मुंबईत मोटर गॅरेज उघडले आहेत. शिवाय अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गाड्या दुरस्त करण्यासाठी सर्व्हिसिंग सेंटरवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे.
कारच्या वायरिंग उंदरानी कुरतडल्या
मुंबईत उंदरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून उभ्या असलेल्या दुचाकी, चारचारी वाहनांच्या वायरिंग मोठ्या प्रमाणात कुरतडल्याचे समोर आले. वाहनाची वायरिंग खराब झाल्याने अनेकदा वाहन सुरू होत नाही. तसेच प्रसंगी स्पार्किंगही होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
उंदरानी वायर कुरतडल्याने माझ्या कारमध्ये शॉर्टसर्कीट झाले. परिणामी मला गाडीची संपूर्ण वायरिंग बदलवावी लागली. आधीचं टॅक्सीचा व्यवसाय 70 दिवस बंद ठेवल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता हे दुरस्तीसाठीचे पैशै आणायचे कुठून हा प्रश्न आहे.
- अल्पेश पडवळ, खासगी वाहन चालकलॉकडाऊन काळात अनेक टॅक्सीचे टायर चोरी गेले आहे. शिवाय गाड्यांच्या बॅटरी उतरल्याने टॅक्सीत बिघाड झालेत. स्पेअर पार्टचे दुकानेही बंद असल्यामुळे टॅक्सीचालकांपुढे अनेक अडचणी उभ्या आहेत.
- ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियनपावसाळ्यापुर्वी वाहनचालकांनी आपल्या गाड्या सर्व्हिसिंग करुन घेणे आवश्यक आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने गॅरेजवर गाड्या दुरुस्त करून घेण्यासाठी मोठी गर्दी आहे.
- विनायक वामन, संचालक, वामन ऑटोलाईन, वाशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.