महाविकास आघाडीच्या बैठकीत 'मोठा' निर्णय; 'या' तारखेपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढवणार - सूत्रांची माहिती

महाविकास आघाडीच्या बैठकीत 'मोठा' निर्णय; 'या' तारखेपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढवणार - सूत्रांची माहिती
Updated on

मुंबई - कोरोना संदर्भातील महाराष्ट्राबाबतीतील सर्वात मोठी बातमी मुंबईतून समोर येतेय. महाराष्ट्रातील लॉक डाऊन हा ३१ मे पर्यंत वाढवणार असल्याचा मुंबईत महाविकास आघाडीत सुरु असलेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर येतेय. चौथा लॉक डाऊन हा नव्या रंगात नव्या ढंगात येणार असल्याचं मोंदींनी सांगितलंय. अशात १७ तारखेनंतर महाराष्ट्रतील लॉक डाऊनमध्ये शिथिलता देणार असल्याचं बोललं जातंय. याचसोबत कोरोना लॉक डाऊनमध्ये बंद पडलेलं अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी राज्यात टप्प्या टप्प्याने उदोगधंदे देखील सुरु करणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येतेय. 

आज (१४ मे ) मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. यामध्ये महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय झालाय. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. यामध्ये सर्व महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रातील लॉक डाऊन हा ३१ मे पर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची अधिकृत सूचना झालेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लॉक डाऊन हा ३१ तारखेपर्यंत वाढणार असल्याचं बोललं जातंय. 

टप्प्या टप्प्याने सुरु होणार महाराष्ट्रातील उद्योगधंदे 
महाराष्ट्राचं अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी टप्प्या टप्प्याने महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना सुरु करण्यात येणार असल्याचं देखील अमोर येतंय. यासाठी काही नियम शिथिल केले जातील अशी माहिती समोर येतेय. येत्या दोन दिवसात याबाबत घोषणा केली जाणार आहे. सध्या ऑरेंज आणि आणि ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु झाले आहेत. अशात रेड झोनबद्दल सरकार कसा निर्णय घेतं ? नवीन कोणत्या नियमांद्वारा काही अटी शिथिल करता येईल का ?यावर आज च्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. 

lockdown in maharashtra will be extended till 31st may says sources

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.