आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?
Updated on

मुंबई - वाढीव म्हणजेच दुसरा लॉक डाऊन (Lockdown2.0) येत्या काही दिवसात म्हणजेच ३ मे रोजी संपेल. जसा २१ दिवसांचा काळ गेला तसाच ३ मे पर्यंतचा दुसरं लॉक डाऊन देखील काहीच दिवसात संपेल. पण मुंबई पुणे जिथं मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आहे अशा शहरांचं काय?  ३ तारखेनंतर सर्व काही जैसे थे होईल असं तुम्हाला वाटत असेल तर हा रिपोर्ट आधी वाचा. कारण मुंबई पुणे MMR रिजनमधील शहरांमधील लॉक डाऊन ३ मे पासून पुढे जून महिन्यापर्यंत सुरूच राहू शकतं.    

सध्या तरी मुंबई MMR आणि पुणे MMR भागातील लॉक डाऊन उठवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. जर या भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर या भागांमधील लॉक डाऊन किमान जून पर्यंततरी वाढवायला लागेल, अशी माहिती  महाराष्ट्र सरकारमधील अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिली आहे. उलट वाढत्या कोरोना केसेस पाहता रेड झोनमध्ये आणखीन कठीण निर्बंध लादले जाऊ शकतात. परिणामी ट्रेन्स, बसेस याचसोबत दुकानं किमान जूनपर्यंत बंदच राहताना पाहायला मिळतील.  

महाराष्ट्र सरकारकडून राज्याची ठप्प असलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होतोय. अशात मुंबईसारखं शहर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या स्थितीत सरकारकडून राज्याची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातायत यावर देखील अनेकांच्या नजर आहेत.

मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना पाहायला मिळतेय. कधी तीनशेच्या वर तर कधी चारशेच्या वर, दररोज मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. शुक्रवारपर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी ४५८९ एवढी होती. नुकतंच केंद्रीय आरोग्य पथक मुंबईतील विविध कन्टेन्टमेन्ट झोनमध्ये फिरून आलं. धारावी सारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोना फोफावू नये यासाठी अधिक जास्त क्वारंटाईन सेंटर्स सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. काही अभ्यासकांच्या मते मुंबईत मे महिन्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळतील असं देखील बोललं जातंय.  

त्यामुळे मुंबई पुणेकरांनो मनाची तयारी करायला सुरवात करा. कारण जोपर्यंत मुंबई पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत नाही तोपर्यंत किमान जूनपर्यंत तरी मुंबई आणि पुणे MMR भागातील लोक डाऊन किमान जून पर्यंत कायम राहील अशी शक्यता आहे. 

lockdown in mumbai and pune may extend till june read full story about third lock down

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.