सर्वात मोठी बातमी - देशातील लॉक डाऊनमध्ये १४ दिवसांची वाढ, देशात आता तिसरा लॉक डाऊन

सर्वात मोठी बातमी - देशातील लॉक डाऊनमध्ये १४ दिवसांची वाढ, देशात आता तिसरा लॉक डाऊन
Updated on

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन पाळला जातोय. येत्या ३ तारखेला दुसरा देशव्यापी लॉक डाऊन संपणार आहे. अशात एक मोठी बातमी आता समोर येतेय. देशव्यापी लॉक डाऊनमध्ये आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आलीये. म्हणजेच आता देशात ४ ते आणखी १४ दिवस म्हणजे १७ मे या तारखेपर्यंत लॉक डाऊन असणार आहे.

केंद्राकडून याबाबत नोटिफिकेशन काढून माहिती देण्यात आली आहे. केंद्राकडून देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागवारी केली गेलीये. अशात वाढीव लॉक डाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सवलती देखील मिळू शकतात. दरम्यान देशातील रेड झोनमध्ये नियम आणखी कठोर केले जाऊ शकतात. मात्र कोणत्याही झोनमध्ये रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक, शाळा, महाविद्यालयं, मॉल्स, धार्मिक स्थळं, चित्रपटगृहं या गोष्टी सुरु होणार नाहियेत.     

काही दिवसांपूर्वी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला होता. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये देशातील लॉक डाऊन वाढवावा असाच मुख्यमंत्र्यांचा सूर उमटला होता. या पार्श्वभूमीवर आता देशातील लॉक डाऊन पुन्हा एकदा १४ दिवसांसाठी वाढवला गेलाय.  

lockdown three lockdon in india increased by 14 days read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.