- मोहिनी जाधव
बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या भिवंडी जागेसाठी आघाडी पक्षांमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी, जोरदार प्रयत्न सुरू झाले असून, त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नवनियुक्त भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांच्या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील दौऱ्या निमित्त, काल बदलापूरात त्यांचे राष्ट्रवादी कडून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी गेल्या साडेनऊ वर्षात रेंजमध्ये नसलेल्या खासदारांनी, बदलापूर साठी कोणतीही विकास कामे केली नाहीत, फक्त भुलथापा दिल्या. आणि हे मी आगामी भिवंडी दौऱ्या वेळी होणाऱ्या सभेत पुराव्यानिशी सिद्ध करेन असे म्हणत, थेट केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला.
सध्या लोकसभा निवडणुकांच्या चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. याच प्रवाहात आघाडीतील मित्र पक्षांकडून सुद्धा, जोरदार तयारी सुरू झाली असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली भिवंडी लोकसभा जागेसाठी आघाडी पक्षांमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी, राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या,
सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे नाव समोर येत असून, नुकतच त्यांना भिवंडी लोकसभा प्रभारी हे पद पक्षाकडून देण्यात आलं आहे. त्यांनी देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने दौरे सुरू केले असून, काल मुरबाड दौऱ्यानिमित्त त्यांनी बदलापूर शहराला भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने सुरेश म्हात्रे यांच, बदलापूर पूर्व संजीवनी हॉल या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत, गेल्या साडेनऊ वर्षात मतदार संघाचा खासदार म्हणून पाटील यांनी कोणतीही कामे बदलापूर साठी केली नाहीत,
आणि आता त्यांना बदलापूर शहरात जनसंपर्क कार्यालय सुरु करावेसे वाटले पण जनता सुजाण आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून होम प्लॅटफॉर्मच रखडलेल्या अवस्थेत आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी देखील पाटील यांना यश आलेले नाही, अशी अनेक कामे आहेत ज्या कामांमध्ये फक्त पाटील यांनी बदलापूरकरांना भूल थापा दिलेल्या आहेत.
या सगळ्याचा आगामी भिवंडी दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत पुराव्यानिशी खुलासा करेन, असा इशारा त्यांनी कपिल पाटील यांना दिला आहे. त्याचबरोबर फोडाफोडीचे राजकारण करण्याचा विचार भिवंडी व मुरबाड मतदार संघात करू नका असे झाले तर,
आम्ही सुद्धा या राजकीय तंत्राचा वापर करूनच तुम्हाला उत्तर देऊ असे खडे बोल भाजपाला सुनावले. यावेळी आघाडी पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर जो निर्णय येईल त्या निर्णयाचं स्वागत आम्ही करू,
जर भिवंडी लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली व पक्षाने या उमेदवारीसाठी माझा विचार केला तर नक्कीच त्या दृष्टीने मतदार संघात जोमाने तयारी करून, राष्ट्रवादीची जागा शंभर टक्के निवडून आणण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी देखील मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या साडेसातशे कोटी रुपयांच्या निधीबाबत केलेल्या खुलासाचा खरपूस समाचार घेत नक्की हा निधी आला आहे का याचे आमदारांनी कागदोपत्री शासकीय पुरावे
दाखवावेत त्याचबरोबर मेट्रो सारख्या प्रकल्पांच्या भूल थापा देण्यापेक्षा बदलापूर शहराची गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या पाण्याची समस्या व इतर मूलभूत समस्या सोडवण्यावर भर देण्याचा सल्ला आमदार किसन कथोरे यांना दिला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.