Loksabha News: मुंबईतील लोकसभेच्या सहा जागा जिंकण्याचा भाजप निर्धार

निवडणूक संचालन समितीचे समन्वयक म्हणून अतुल भातखळकर यांची नियुक्ती
Mumbai Loksabha News
Mumbai Loksabha News sakal
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन 'महाविजय २०२४' अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

दादर येथे भाजपा कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

Mumbai Loksabha News
Loksabha Election : ऐतिहासिक निकालाचा लोकसभा निवडणुकीत दिसणार परिणाम; शिंदे गटाला मिळणार बळ, विधानसभेत असणार 'चॅलेंज'

या बैठकीदा कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन लोकसभा निवडणूक संचालन समितीचे संयोजक आ. अतुल भातखळकर, आ. प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. याच अनुषंगाने मुंबई लोकसभा निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली.

Mumbai Loksabha News
Loksabha Election : निवडणुकीत काकांचा 'खांद्यावर हात पॅटर्न' नाही चालणार; काँग्रेस आमदाराचा BJP खासदाराला टोला

या समितीचे अध्यक्षपद मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्याकडे असून आ. अतुल भातखळकर संयोजक, तर संजय उपाध्याय, आ. सुनील राणे, आ.अमित साटम आणि आ. योगेश सागर यांना सह- संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे.

बुथ समित्या अधिक सक्षम करून पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे.

Mumbai Loksabha News
Nagar South Loksabha: दक्षिण जिंकायचं, तर गोळाबारूद हवा! विखे पाटलांची पॉवर पण समीकरणे बदलली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.