सोलापूरच्या बांधकाम व्यावसायिकाला दोन कोटींचा गंडा, सहा जणांना अटक

Fraud
Fraud sakal media
Updated on

मुंबई : लॉकडाऊनची (Lockdown) मोठी झळ बांधकाम क्षेत्राला बसली असल्यामुळे इतर व्यवसायात गुंतवणूकीची (Investment) संधी शोधत असलेल्या सोलापूरमधील बांधकाम व्यवसायिकाला दोन कोटींचा चुना (Fraud) लावल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सहा जणांना (Arrest) अटक केली. आरोपींनी अहमदाबाद (Ahmadabad) येथील आव्हाडा पॉवर कंपनीत गुंतवणूकीच्या नावाखाली रक्कम घेतली व ती रक्कम गुंतवलीच नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ( lokmanya tilak police arrested six people for two crore fraud Solapur businessman-nss91)

तक्रारदार सुभाष चव्हाण हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी आहेत. ते भागिदारीमध्ये बांधकाम व्यवसायात सक्रीय होते. पण कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यामुळे बांधकाम व्यवसायाला त्याची मोठी झळ बसली. चव्हाण यांचाही व्यवसाय अपेक्षेप्रमाणे होत नसल्यामुळे त्यांनी या काळात रक्कम इतर व्यवसायात गुंतवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी झवेरी बाजार परिसरातील अंगडिया व्यवसायिकांच्या ते संपर्कात आले. आरोपींनी त्यांचे विविध व्यवसायिकांशी ओळख असून ते तक्रारदार यांना त्यांचे पैसे विविध व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी मदत करतील, असे आश्वासन दिले. आरोपींनी अहमदाबाद येथील आव्हाडा पॉवरमध्ये गुंंतवणूक करण्याचे आश्वासन घेऊन तक्रारदार यांच्याकडून थोडे थोडे करून दोन कोटी रुपये घेतले. 9 जूनला त्यांनी 50 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर त्यांना एक कच्ची पावती व कोड म्हणून नोटेचा क्रमांक सांगण्यात आला.

Fraud
मुंबईला दिलासा! झोपडपट्टी परिसरात 'कंटेन्मेंट झोन'मध्ये घट

त्याच्यामार्फत व्यवहाराची ओळख पटेल, असे सांगण्यात आले. रक्कम भरल्यानंतर आरोपींची ओळख आव्हाडा पॉवरचे कर्मचारी असल्याचे दाखवून काही व्यक्तीसोबतही करण्यात आली. या रकमेबाबत रितसर मेमोरॅटम ऑफ अंडरस्टॅडींग(एमओयू) बनावण्यात आला. पुढे तक्रारदार यांनी चौकशी केली असता त्यांच्या नावाने कोणतीही रक्कम या कंपनीत गुंतवण्यात आली नव्हती अखेर तक्रारदार यांनी आरोपी व्यक्तींशी संपर्क साधला असता त्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवूक झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कॉफर्ड मार्केट जवळील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली.

प्राथमिक तपासात चव्हाण यांनी दोन कोटी रुपायंची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेल्यानंतर पोलिसांनी भांदवि कलम 406, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणी महाराष्ट्र व गुजरातमधून विजय नखवली(48), राजू वडेश्वरा(37), मिलिंग घाडगे(39), संजय दत्ता(33), घनश्याम वैष्णव(33) व जितेंद्र ताक(46) अशा सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी हे गुजरातमधील कच्छ, सोलापूर व मुंबईतील आहेत. तपासात आणखी दोन संशयीतांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.