Loksabha Election Voting : मुंबईतील संथ मतदानाची चौकशी करा; अनिल देसाई यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबईत कासवगतीने झालेले मतदान आणि मतदान केंद्रावरील गैरव्यवस्थापनाबाबतचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेवून जाब विचारला.
Mumbai Voting
Mumbai Votingsakal
Updated on

मुंबई - मुंबईत कासवगतीने झालेले मतदान आणि मतदान केंद्रावरील गैरव्यवस्थापनाबाबतचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेवून जाब विचारला. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचीही गंभीर तक्रार यावेळी या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांनी केली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

मुंबईत मतदारांना तीन-चार तास रांगेत उभे राहावे लागले. त्याचबरोबर मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचीही प्रचंड गैरसोय झाल्याने निवडणुकीच्या कर्तव्यावर असणारे सुनील गवळी यांचाही मृत्यू झाला असल्याने पक्षाने संताप व्यक्त केला आहे.

मुंबईत मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले होते, पण त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदार मतदान न करताच परत गेल्याच्या घटना मुंबईत घडल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी संथ गतीने राबवलेल्या प्रक्रियेमुळे मतदानाचा टक्का घसरल्याचा आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेने केला आहे.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देसाई म्हणाले, की कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन या निवडणुकीत नव्हते. मतदार उन्हात ताटकळलेच, शिवाय निवडणूक कर्मचारी, पोलिस यांचीही प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी, मतदारांसाठी पाण्यासारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. निवडणुकीच्या ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.

मतदान प्रकियेत हस्तक्षेप

काही ठिकाणी मतदान प्रक्रियेतही हस्तक्षेप झाला असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे. मतदान कोणत्या निशाणीवर करायचे हे सांगितले जात होते असा दावा त्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा आहेत, असे ते म्हणाले.

आयोगाच्या निष्काळजीपणाचा मतदारांना फटका - आव्हाड

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारयादीमधून अनेकांची नावे गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणाचा अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

आसाममध्ये ७८ टक्के, बंगालमध्ये ८१ टक्के मतदान झाले. पण महाराष्ट्रात इतके कमी मतदान करताना काय झालंय ते लोकांच्या लक्षातच आलेले नाही. मतदान केंद्रांवर पाणी नव्हतं, पंखे नव्हते, काही ठिकाणी मशिन बंद पडल्या. मतदारांची गैरसोय कशी होईल हे पाहिले गेले. मी कळवा-मुंब्रा येथील आमदार म्हणून मी खुली तक्रार करतो आहे की हे निवडणूक आयोगाचे सपशेल अपयश आहे, असे आव्हाड म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेमुळेच हे सगळे झाले आहे. लोकांना मतदान करायचे होते, मात्र कुठे नावंच नाही, कुठे मतदान केंद्रच दूर अशा घटना घडल्या आहेत. मतदान करायला लोकांना चार-चार तास लागत होते, ही वस्तुस्थिती आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.