Loksabha Election 2024 : धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या निवडणुकीत मशाल पेटणार

महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना नागरिकांकडून प्रत्येक शहरात, वाड्या, वस्त्यांत प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Vaishali Darekar
Vaishali DarekarSakal
Updated on

- वरुण सरदेसाई

उल्हासनगर - महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना नागरिकांकडून प्रत्येक शहरात, वाड्या, वस्त्यांत प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मशाल निशाणी सांगितल्यावर नागरिक चिअर अप करून असून स्वतःहून पुढे येऊन दरेकर यांचा सत्कार करू लागले आहेत.

त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या निवडणुकीत वैशाली दरेकर निवडून येणार आणि कल्याण लोकसभेत मशाल पेटणार असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी उल्हासनगरात व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने बिर्ला गेट येथून वैशाली दरेकर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत शिवसेना नेते वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, शिवसेनेचे कल्याण जिल्हा समनव्यक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, कल्याण जिल्हा युवासेना अधिकारी भाऊ म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, माजी जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, शिवसेना शहरप्रमुख पिंकी भुल्लर, कैलास तेजी, महिला आघाडी संघटक जया तेजी, विधानसभा संघटक मंगला पाटील, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, राजन वेलकर, शिवाजी जावळे, भगवान मोहिते, चंद्रशेखर यादव, राजू माने, मधुकर साबळे, विभागप्रमुख सुनील पाटील, दीपक साळवे, शाखाप्रमुख, महिला आघाडी, शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोण कुणाचेही काम करूद्या पण जनता मात्र महाविकास आघाडी,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.