Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal

Loksabha Election: महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप ३१, शिंदे गट ‍‌१२, राष्ट्रवादी ४ जागा लढणार?

जागावाटपाची तयारी: महायुतीतील भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादीचे समीकरण ठरले?
Published on

Mumbai News: लोकसभा निवडणुकीची घोषणा २४ तासांवर आली असताना महाराष्ट्रातील जागावाटप निश्चित झाले असल्याचे विधान ज्येष्ठ भाजप नेते अमित शहा यांनी एका वाहिनीशी बोलताना केले आहे.

शिवसेना शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप ३१, शिवसेना शिंदे गट १३ जागा लढणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र चार जागांवर समाधान मानावे लागणार आहे. चिन्हाबद्दलची लढाई न्यायालयात सुरू असताना आता या आकड्याला मान्यता देत विधानसभेच्या वेळी जास्त जागा देऊ, असे या पक्षाला समजावण्यात आले आहे. काही जागांबाबत महायुतीत अद्याप चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics
Baramati Loksabha Election : देशातील सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामतीत होणार....

उद्या किंवा परवा केंद्रीय नेत्यांशी भाजपच्या मित्रपक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे. रविवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर लगेचच हे जागावाटप घोषित करण्यात येईल. नाशिक, रामटेक, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले या शिवसेना शिंदे गटाचे खासदार असलेल्या जागा त्यांचे उमेदवार जिंकू शकणार नाहीत, असे भाजपला वाटते आहे. तेथे सामोपचाराने तोडगा काढण्यात येतो आहे.

सातारा, शिरूर, माढा, परभणी, गडचिरोली या जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हव्या आहेत; मात्र वस्तुस्थिती लक्षात घ्या अन् जिंकण्यासाठी लढायचे आहे हे लक्षात घ्या, असे शहांनी पुन्हा एकदा सांगितल्याचे समजते. अमरावतीसारख्या जागांवरही वाद आहे. महाराष्ट्रातील काही जागांबाबत केंद्रातून काहीशी आग्रही भूमिका घेतली गेली आहे, असे समजते. मुंबईतील पाच जागा भाजप लढणार असून दक्षिण मध्य मुंबई ही एक जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात येईल. दक्षिण मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजप उमेदवारी देईल, असे बोलले जाते.

Maharashtra Politics
Loksabha Election 2024: दोन टर्म भाजपचा खासदार तरीही राष्ट्रवादीला हवी सोलापूर लोकसभेची जागा; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

गजानन कीर्तिकर खासदार असलेला उत्तर पश्चिम मतदारसंघ भाजपकडे येणार असला तरी उमेदवाराचा शोध सुरू आहे. उत्तर मध्य मतदारसंघात पूनम महाजन यांना लढवावे की नवा चेहरा द्यावा, हा प्रश्न सुटलेला नाही.

अमरावतीचा लोकसभा मतदारसंघ भाजपने लढावा, असे आग्रही प्रतिपादन अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा सातत्याने करीत आहेत; तर गेल्या वेळी शिवसेनेकडून लढून पराभूत झालेल्या आनंदराव अडसूळ यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे.


निर्णय दिल्ली मुख्यालय घेणार


महायुतीतील जागावाटप चर्चा रेंगाळत राहिली तर त्याचे मतदारांच्या मनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तिढा लवकर सुटावा, असे मित्रपक्षांना वाटत असतानाच याबद्दलचा निर्णय मात्र भाजपचे दिल्ली मुख्यालय घेणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बोलावणे येताच चर्चेसाठी जाण्याची आमची तयारी आहे, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

Maharashtra Politics
Loksabha Election 2024 : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची लोकसभा निवडणूकीत एंट्री! कुठून केली उमेदवारी जाहीर माहितीये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.