Kalyan News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. शिंदे यांचा हा मतदारसंघ असला तरी येथे इतर पक्षीयांची ताकद देखील तेवढीच जास्त आहे. (kalyan loksabha Latest News)
शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र मनसे, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीचे देखील येथे वर्चस्व असून हा मतदारसंघ म्हणजे पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरत आहे. ठाकरे गटाच्या दौऱ्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 23 व 24 तारखेला या मतदारसंघात येत आहेत. (kalyan news latest)
तर 24 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगड यात्रेनिमित्त मलंगगड येथे उपस्थित राहणार आहेत. 25 तारखेला श्रीनिवास कल्याणम कार्यक्रम करिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. (loksabha election Latest News)
सर्वच नेतेमंडळींचे कल्याण लोकसभेचे दौरे पाहता कल्याण लोकसभेचे महत्व वाढल्याच दिसत आहॆ. जसजशी निवडणूक येईल तसतसे कल्याण लोकसभेत राजकिय वातावरण तापत आहॆ.(mumbai Political News)
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळणारी वाढती सहानुभूती पाहता आणि आदित्य ठाकरे यांना मिळणारा नागरिकांचा रिस्पॉन्स पाहता कल्याण लोकसभा मतदारसंघाला महत्व आले आहे.(mns political News in kalyan)
शिवसेनेत फूट पडल्यावर भाजपची ताकद वाढल्याचे दिसते. मात्र वेळोवेळी शिंदे गटाकडून भाजप पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण केल्याचे दिसून आले आहे. यातच मनसे विरोधी पक्षाची भूमिका घेत स्वतःची एक वेगळी स्पेस निर्माण केली आहे
कल्याण लोकसभा हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेना मानणारा वर्ग या लोकसभेत मोठ्या प्रमाणात आहे.(maharashtra ubt political new)
तसेच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील सुध्दा याच लोकसभेत राहतात व कल्याण ग्रामीणचे ते आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार असून त्यांची तिसरी टर्म आहे.(kalyan political News)
तर आमदार गणपत गायकवाड यांची सुद्धा तिसरी टर्म असून ते कल्याण पूर्वचे आमदार आहेत. शरद पवार गटातील फायरब्रॅंड नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघात कळवा मुंब्रा विधानसभेचे नेतृत्व करतात.(Thane Political News)
गेल्या वर्षभरात कल्याण लोकसभेत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील राजकारण फारच तापले होते. त्यातच गोळीबारानंतर शिंदे यांची शिवसेनेचे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये फारसे पटत नसल्याचे दिसून आले आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांची क्रेझ कल्याण लोकसभेत असल्याने आणि स्थानिक पातळीवर मनसेने उचलून धरलेले विषय पाहता मनसे विरोधकांची स्पेस घेऊ पाहत आहे.त्यामुळे येत्या काळात कल्याण लोकसभेवर कोणाचा झेंडा फडकतो हे पहावे लागेल.(Maharashtra News Latest)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.