Kapil Patil: भिवंडी लोकसभेत अनेक वर्षात जी कामे झाली नाहीत ती आता होत आहेत

कपिल पाटलांना तिसऱ्यांदा संधी; जनतेने पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवून मला विजयी करावे असे आवाहन
kapil patil and narendra modi
kapil patil and narendra modi sakal
Updated on

Kapil Patil: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्याच यादीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने पाटील यांना तिसऱ्यांदा संधी देऊ केली आहे. पाटील यांना तिकीट मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाटील यांनी देखील जनतेने पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवून मला विजयी करावे असे आवाहन मतदारांना केले आहे.

kapil patil and narendra modi
Sakal Survey 2024: Loksabha Election मतदारांचा कल कोणाला?|Maharashtra Politics

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम उमेदवार जाहीर करण्यामध्ये भाजपा पक्षाने आघाडी घेतली आहे. आपल्या 20 उमेदवारांची यादी भाजपने बुधवारी जाहीर केली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.

त्यांच्या उमेदवारीनंतर एकच जल्लोष त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत सर्व समर्थक कार्यकर्त्यांनी केले. खासदार पाटील हे आपल्या निवासस्थानी दाखल होताच पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांना टोला हाणण्याची संधी सोडली नाही. पाटील म्हणाले, भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याबद्दल कपिल पाटील यांनी धन्यवाद व्यक्त केले.

kapil patil and narendra modi
Satara Loksabha जागेवरून महायुतीत वाद? Ajit Pawar यांचे महत्वाचे विधान | Maharashtra Politics

भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असंख्य विकास कामांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची निधी उपलब्ध करून सदृश्य कामांच्या माध्यमातून विकास घडवून आणला आहे. आणि त्यामुळे या मतदारसंघातील नागरीक नक्कीच या मतदार संघाची सेवा करण्याची संधी मला देतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. देशाच्या विकासासाठी भिवंडी लोकसभेतील नागरिक मला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील.

विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नसल्याने ते फक्त आरोप करीत आहेत, असा आरोप कपिल पाटील केला. तर भिवंडी लोकसभा मतदार संघातील जी विकास कामे केली आहेत, त्याच्या आम्ही व्हिडिओ क्लिप सोबत ऑडिओ क्लिप काढल्या आहेत. काही लोकांचे डोळे फुटले आहेत. त्यांना दिसत नाही, कमीत कमी त्यांना ऐकायला तरी येईल. भिवंडी लोकसभेत अनेक वर्षात जी कामे झाली नाही ती आता होत आहेत आणि झाली आहेत. असा टोलाही पाटील यांनी लगावला आहॆ...

kapil patil and narendra modi
Baramati Politics: बारामतीकरांचा कल अजितदादांच्या विकासाच्या बाजूने; सुनेत्रा पवारांचा विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.