मुंबईः दिवाळीचा सण आणि त्यात जोडून रविवार, त्या पार्श्वभूमीवर सलग सुट्यांचा परिणाम मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे सहित सर्व प्रमुख रस्त्यावर झाला. एक्स्प्रेस वे सहित खालापुरातील अन्य सर्वच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास खालापूर टोल नाक्यावर वाहनांची गर्दी प्रमाणापेक्षा वाढल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान महामार्ग वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, काही काळ टोल न घेता वाहने सोडण्यात आल्यावर येथील कोंडी कमी झाल्याचे दिसून आले.
रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत एक्स्प्रेस वरील खालापुर टोल नाका, जुना महामार्ग वरील खोपोली-खालापूर अंतरावर आणि खोपोली-पेण रस्त्यावर पाली फाटा, खोपोली शीळफाटा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एक्स्प्रेस वे मार्गे रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे, माथेरान, लोणावळा-खंडाळा आदी पर्यटन स्थळे परिसरात येण्यासाठी चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी उसळली. परिणामी एक्स्प्रेस वे च्या खालापूर टोल नाक्यावर दोन्ही बाजूने दोन तीन किमीच्या रांगा लागल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर परदेशी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही काळासाठी टोल न घेता चार चाकी वाहने सोडण्याचा निर्णय घेतला आणि येथील कोंडी कमी झाली.
तसेच टोल नाक्यावरील दोन्ही बाजूंसाठी अतिरिक्त लेन ही सुरू करण्यात आल्याने कोंडी फुटण्यास मदत झाली. मात्र याचा परिणाम खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी होणावर झाल्याने दुपारी बारा वाजल्यानंतर पुन्हा नियोजनामध्ये बदल करून टप्याटप्याने वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळ पासून दिवसभर एक्स्प्रेस वे आणि अन्य प्रमुख रस्त्यांवर वाहने वाढल्याने रस्ते हाऊसफुल्लच राहिले.
----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Long queues of vehicles at Khalapur Toll Naka
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.