मोठी बातमी- परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी

दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे.
parambir singh
parambir singhesakal
Updated on

अंधेरी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना आता परदेशात जाता येणार नाही. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. (Lookout notice issue against former mumbai police Commissioner parambir singh dmp82)

त्या बरोबरच त्यांच्यावर होणारे आरोप-प्रत्यारोप आदींमुळे प्रकरण वाढत चालले आहे. दरम्यान परमबीर सिंग मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात "लुक आऊट" नोटीस जारी केली असून त्याची माहिती विमानतळ आदी ठिकाणी देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये, परदेशात जाऊ नये यासाठी ही "लुक आऊट" नोटीस जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

parambir singh
'बर्तनवाली', 'सिंगल मदर'ची स्क्रिप्ट दाखवून ओढायचे पॉर्नच्या जाळ्यात, समोर आली धक्कादायक माहिती

दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने 28 जुलै पर्यंत दिलासा दिला होता. या दिलाशाची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात "लूक आऊट" नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची किंवा त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

parambir singh
अंधेरीत कोसळली चार मजली इमारत

त्याच बरोबर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या पोलिसांची बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे अकबर पठाण यांची बदली सशस्त्र विभाग नायगाव येथे करण्यात आली असून एसीपी पाटील यांची सुद्धा बदली केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()