Loss of Profit Insurance : "लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स" चे कवच आता उद्योग विश्वासाठी हवेच - शशीकांत दहुजा
आऊटेजच्या घडांमोडीत प्रवासी उद्योग क्षेत्र बातम्यांच्या मथळ्यात अग्रभागी राहिले. विशेषतः सतत प्रकाशझोतात आणि चर्चेत असलेले विमान वाहतूक क्षेत्र बातम्यांच्या मथळ्यांमध्ये प्रकर्षाने झळकले.
एकमेकांशी गुंफल्या गेलेल्या सध्याच्या जगात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कोणीही नाकारू शकत नाही. तथापि, प्रचंड प्रमाणातील या अवलंबित्वामुळे कामकाजात मोठा व्यत्यय येण्याचा धोकाही तितकाच मोठा आहे.