Railway Mega Block : मेगाब्लॉकमुळे उच्चभ्रू सोयायट्यामधील कुटुबांना फटका; घरकाम करणाऱ्या महिलांच्या दांडीमुळे गृहिणींची तारांबळ

उपनगरीय लोकल सेवेला (Mumbai Local) मुंबईकरांची जीवनवाहिनी का म्हटले जाते याची प्रचिती मेगाब्लॉकमुळे दिसून आली.
Central Railway Megablock Mumbai
Central Railway Megablock Mumbaiesakal
Updated on
Summary

घरकाम करणाऱ्या अनेक महिला उपनगरातून दररोज लोकलने मुंबईत कामाला येतात.

-नितीन बिनेकर

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा फटका मुंबईतील (Central Railway Megablock Mumbai) भायखळा, दादर, घाटकोपर आणि अंधेरी येथे असलेल्या उच्चभ्रू सोयायट्यामधील कुटुबांनाही बसला आहे. या हायफाय सोसायट्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला ठाणे, कल्याण, डोबिवली आणि बदलापूर परिसरातून येतात. मेगाब्लॉकमुळे या महिलांनी काल (शनिवारी) घरीच बसणे पसंत केले. त्यामुळे अनेक फ्लॅटमध्ये झाडू, पोछा लागला नसल्याची परिस्थिती उद्भवली असल्याचे चित्र आहे.

उपनगरीय लोकल सेवेला (Mumbai Local) मुंबईकरांची जीवनवाहिनी का म्हटले जाते याची प्रचिती मेगाब्लॉकमुळे दिसून आली. घरकाम करणाऱ्या अनेक महिला उपनगरातून दररोज लोकलने मुंबईत कामाला येतात. बदलापूर येथे राहणाऱ्या हेमलता साळवी या भायखळ्यातील राणीबाग भागातील एका सोसायटीत घरकाम करतात. मात्र, रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे हेमलता यांनी कामावरुन सुट्टी घेतली. भायखळ्यात राहणाऱ्या एका मैत्रीणीला त्यांनी आजचा दिवस निभावून नेण्याची विनंती केली. हेमलता यांच्या प्रमाणे अनेक घरकाम करणाऱ्या महिला कामावर गेल्या नाही.

Central Railway Megablock Mumbai
Central Railway Mega Block : मेगा ब्लॉकचा मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांना सर्वाधिक फटका; मुंबई गाठण्यासाठी अतोनात हाल
Central Railway Megablock Mumbai
शेतकऱ्याच्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न, राजगडमध्ये धक्कादायक घटना; 'राष्ट्रशक्ती'ची कारवाईची मागणी

साहेब पगार कापू नका!

शनिवारी रेल्वे मेगाब्लॉकमुळे घर कामाला दांडी मारावी लागली. त्यामुळे एक दिवसाचा पगार बुडेल अशी चिंता या महिलांना सतावते आहे. कृपया आमची प्रवासाची अडचण समजून घ्या आणि शनिवारचा पगार कापू नका, अशी विनंती या घरकाम महिलांनी 'सकाळ'च्या माध्यमातून केली.

सुट्टीमुळे तारांबळ

घरकाम महिलाने अचानक सुट्टी घेतल्यामुळे घरातील कामे खोळंबल्याचे चित्र होते. अनेक घरात पती-पत्नी दोघेही कामावर जातात. त्यामुळे मुले सांभाळण्याची समस्या निर्माण झाली. घरकाम करणारी महिला कामावर न आल्यामुळे पती-पत्नीपैकी एकाला सुट्टी घ्यावी लागली. कित्येक घरात कसा बसा झाडू, पोछा आटोपला. मात्र, धुणीभांडी करताना दमछाक झाल्याचे चित्र होते.

दररोज बदलापूर ते ठाणे लोकलने प्रवास करते. ब्लॉकमुळे शनिवारी आम्ही कामावर गेलो नाहीत. यासंदर्भात आम्ही घर मालकांना कळवले आहे.

-अनिता जाधव, बदलापूर

लोकल सेवाच्या फेऱ्या कमी होणार असल्याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे आम्ही शनिवारी घर कामाला जाणे टाळले. या संदर्भात पूर्वसूचना दिली आहे.

-प्रेमीला घोंगडे, कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.