संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन; रोख रक्कमेसह बॅग RPF कडे सुपूर्द

बॅगेची तपासणी केल्यावर दिसली 66 हजार रुपयांची रोख रक्कम
Central railway police
Central railway policesakal media
Updated on

मुंबई : उपनगरीय रेल्वे प्रवासात (Subrban Railway journey) प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, बॅगा हरविण्याच्या घटना (important belongings lost) घडतात. त्यानंतर या वस्तू, बॅगेचा शोध घेणे कठीण होऊन बसते. पोलिसात तक्रार (police complaints) करून देखील मौल्यवान सामग्री परत मिळण्याची शक्यता कमी असते. अज्ञात बॅग प्रामाणिकपणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहचविणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी आहे. परंतु, मुंबई मध्य रेल्वेच्या (central railway) कुर्ला स्थानकात अज्ञात बॅग प्रामाणिक प्रवाशाने कुर्ला आरपीएफच्या (Kurla RPF) हवाली केली. (Lost bag including cash given to kurla railway protection force by true traveler dattaram padhere)

Central railway police
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा; नगरसेवक भिडले

त्यानंतर बॅगेची तपासणी केल्यानंतर तब्बल 66 हजार 561 रुपयांची रोख रक्कम आणि इतर कपडे दिसून आले. आरपीएफने संपूर्ण माहिती घेऊन अज्ञात बॅगेच्या मालकाचा शोध घेऊन त्याला ती बॅग परत दिली. तर, प्रामाणिक प्रवासी दत्तराम पधेरे यांचे आरपीएफ विभाग, बॅगेच्या मालकांने कौतुक केले. बुधवारी, (ता.29) रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास कल्याण हून कुर्लापर्यंत आलेल्या लोकलमध्ये प्रवासी दत्ताराम पधेरे यांना नवी कोरी बॅग मिळाली.

त्यानंतर त्यांनी तत्काळ कुर्ला स्थानकाच्या आरपीएफ ठाण्यात जाऊन आरपीएफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे दिली. त्यानंतर, या बॅगेची उप निरीक्षक जयश्री पाटील, हेड काॅन्टेबल एस. एच. मेटकर, काॅन्टेबल सरिता सिंह आणि प्रवासी दत्ताराम पधेरे यांच्यासमोर तपासणी केली असता, काही कपडे आणि रोख रक्कम दिसून आली. बॅगेची संपूर्ण तपासणी तरी, बॅगेत बॅगेच्या मालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक दिसून आला नाही. त्यामुळे बॅगेच्या मालकाचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न आरपीएफ कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला.

Central railway police
नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवावं - प्रवीण दरेकर

त्यानंतर कुर्ला आरपीएफ इंस्पेक्टर पी. आर. मीना यांनी प्रत्येक स्थानकावरील पोलीस चौकी, पोलीस ठाण्यात, कंट्रोल रुम माहिती दिली. तसेच, आरपीएफच्या व्हाॅट्सअँप ग्रुपमधून संदेश पसरला. तर, जयश्री पाटील यांनी बॅगेतील रोख रक्कम मोजली असता, तब्बल 66 हजार 561 रक्कम आढळून आली. लोकलमध्ये बॅग पैशांनी भरलेली बॅग हरविल्याने बॅगेचे मालक प्रवीण धुमाळ बॅगेचा शोध घेत होते. तर, त्यांना बॅग कुर्ला आरपीएफकडे असल्याचे समजले. त्यानंतर धुमाळ कुर्ला आरपीएफ ठाणे गाठले.

धुमाळ यांनी सांगितले की, कोपर येथून लोकलमध्ये बॅगेसोबत चढलो होतो. त्यानंतर मोबाइल बघत असताना बॅग विसरून कुर्ला स्थानकात उतरून बाहेर पडलो. त्यानंतर आरपीएफ जवानांनी धुमाळ यांची चौकशी करून बॅग त्यांचीच असल्याचे सिद्ध केल्यावर त्यांना बॅग सुपूर्द करण्यात आली. धुमाळ यांनी प्रामाणिक प्रवासी पधेरे आणि कुर्ला आरपीएफचे धन्यवाद मानले.

"प्रवासीविना नवी बॅग आढळून आली होती. बंद बॅगेला वरून हात लावला असता, कपडे समजून आले. कोणी टूर वर जाणाऱ्या प्रवाशाची महत्त्वाची बॅग असल्याने ती बॅग कुर्ला आरपीएफकडे देणे उचित समजले. त्यानंतर आरपीएफने बॅगेची तपासणी करून रोख रक्कम असल्याचे समजले. बॅगेच्या मालकाला बॅग मिळालेल्याचे समाधान आहे."

- दत्ताराम पधेरे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()