मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण दिवाळी अगदी साधेपणाने साजरी करत आहोत. अशात सरकारकडून फटाके फोडण्यास बंदी घातली गेलीये. फटाक्यांनी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रभूषण होते, ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सोबतच फटाक्यांच्या धुरामध्ये अनेक प्रकारचे विषारी वायू देखील असतात. या वायूंमुळे श्वसनाचे त्रास होण्याची भीती असते. अशात यंदा कोरोना असल्याने अनेकांना श्वसनाच्या त्रासाची जास्त भीती वर्तवण्यात आली होती. सोबतच हेच वायू अनेकांच्या जीवावर देखील बेतू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचं दिसतंय.
मुंबईत लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद होते. मात्र यंदा तब्बल पंधरा वर्षानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नीचांकी ध्वनी प्रदूषणाची नोंदणी झाली. कोरोनामुळे अनेक निर्बंध लागू आहेत. अशात मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली. त्याचाच परिणाम आता ध्वनी प्रदूषण कमी करण्यात झालाय. आवाज या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने देखील याबाबत माहिती दिलेली आहे.
यंदा मुंबई महानगरपालिकेने फटाके फोडण्यावर जे निर्बंध घातलेत त्यामुळे यंदा शहरात कमी डेसिबलची नोंद करण्यात आली. मात्र याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नागरिकांमध्ये होत असलेली ध्वनी प्रदूषणाबाबतची जनजागृती देखील आहे. शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंतच्या मुंबईतील आवाजाची आवाजाची पातळी मोजण्यात आली. शिवाजीपार्कात यंदा १०५,५ डेसिबलची नोंद झाली. आवाज फाउंडेशनचे सुमैरा अब्दुलली यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यापूर्वी मुंबईत दिवाळीच्या दिवशी किती होता आवाज
कोरोनामुळे यंदा दिवाळीवर अनेक निर्बंध आहेत. अशात मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारीसाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. तर मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर देखील निर्बंध आहेत .
lowest sound pollution recorded in mumbai since last 15 years says awaaz foundation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.