मुंबई : नुकताच बाबरी प्रकरणावर निकाल आलाय. बाबरी प्रकरणाच्या निकालात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती मिळून एकूण ३२ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल दोनहजार पानी निकालपत्राचं वाचन करण्यात आलं आणि बाबरी पतन हा पूर्वनिययोजित कट नसल्याचंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान, बाबरीचा निकाल आल्यानंतर देशात चर्चा सुरु झालीये ती काशी आणि मथुरेची. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलंय. अयोध्येनंतर आता देशात 'आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याची दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे.' अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली.
याबाबत बोलताना शरद पवार यांनी तत्कालीन केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांच्या प्रतिक्रियेचं उदाहरणं देखील दिलं. बाबरी पतनाबाबत माधव गोडबोले यांचे विधान टीव्हीवर ऐकले. ‘सगळ्या प्रकारचे पुरावे दिल्यानंतरही असा निर्णय होतो, याचं मला आश्चर्य वाटतं,’ हे उद्गार माधव गोडबोले यांचे होते, हा दाखला शरद पवारांनी दिलाय.
बाबरी पतन जेंव्हा झालं तेंव्हा मी केंद्रीय संरक्षण मंत्री होतो. माझा विषय जरी नसला तरीही मला आठवतं की, तेंव्हा माधव गोडबोले तेंव्हाचे केंद्रीय गृहसचिव होते. त्यांनी नरसिंह राव, शंकरराव चव्हाण आणि आमच्या कानावर काही महत्त्वाच्या गोष्टी घातल्या होत्या.
बाबरीच्या वास्तूला धक्का पोहोचणार नाही असं अभिवचन तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी दिलं होतं. मात्र हे अभिवचन पाळलं जाणार नाही असं मत माधव गोडबोले यांनी तत्कालीन केंद्रीय गृह सचिव म्हणून मांडलं होतं. यावेळी नरसिंह राव यांनी कल्याण सिंह यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मत व्यक्त केलेलं. म्हणून गोडबोले यांच्या मताचा स्वीकार झाला नाही, मात्र गोबडबोले यांना जे वाटत होतं तेच झालं असं शरद पवार म्हणालेत.
then union home secretory madhav godbole shared valuable information about babari demolition to sharad pawar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.