Thane News: माघी गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्हा सज्ज; वाचा कसे आहे नियोजन

ठाणे जिल्ह्याची उत्साहाची तयारी; माघी गणेश जयंती साठी साजरी झालेली तयारी
Maghi Ganeshotsav thane
Maghi Ganeshotsav thane sakal
Updated on

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवापाठोपाठ आता माघ महिन्यातील गणेश जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे प्रस्थ गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. आपल्या लाडक्या श्री गणेशाचा हा वाढदिवस असला तरी त्याला भक्तीची जोड देत अनेकजण या निमित्ताने आपला नवसही पूर्ण करतात. म्हणूनच यंदाही ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये १ हजार ७७६ श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना १३ फेब्रुवारीला होणार आहे.

तर मोठ मोठे आकर्षक मंडप उभारत १४९ सार्वजनिक ंमडळेही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यंदा सर्वच राजकीय पक्षांनी गणेश मंडळांना भरभरून दान दिल्यामुळे यावर्षीचा सोहळा हा दिमाखदार होणार आहे.

Maghi Ganeshotsav thane
Thane News: उल्हासनगरमध्ये नक्की सुरु आहे तरी काय? करबुडव्यांसाठी 6 महिन्यात तिसऱ्यांदा अभय योजना!

श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा. यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी १२ फेबु्रवरीला सायंकाळी पावणेपाच वाजता सुरू होणार असून मंगळवारी १३ फेबु्रवारीला दुपारी दोन ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती साजरी होणार आहे.

त्यामुळे गणपती मुर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्याने आणि अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पुजाही करणार असल्याने भटजींपासून देखावा, पुजाअर्चाच्या सामानांची जुळवाजुळव करण्यात चाकरमानी व्यस्त झाले आहेत. गणेश जयंतीला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बहुतेकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.

Maghi Ganeshotsav thane
Thane Fire News: रेतीबंदर घाटाजवळ कंटेनर कॅबिनला आग

दिड दिवसांच्या पाहुणचाराला सर्वाधिक पसंती

घराची पुर्तता, संतान प्राप्ती किंवा नोकरीतील विघ्न दूर झाल्यापासून ते अनेक प्रकारचे गार्‍हाणे घालत माघी गणपतीचा नवस अनेक जण करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून माघी गणपतीला नवसाचे स्वरुपही प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहूतेक जण दीड दिवसांच्या बाप्पाच्या पाहुणचाराला पसंती देतात. गणेशोत्सवात दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधीवत पुजा केली जाते तशीच पुजा माघी गणपतीला केली जाते. यावर्षीही घरी स्थापन होणार्‍या १ हजार ७७६ पैकी १हजार २१९ बाप्पा दिड दिवस पाहुणचार घेणार आहेत.

मुर्तीकारांची तयारी पूर्ण

ठाणे शहरात सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव हे जल्लोषात साजरे केले जातात. नवरात्र व गणेशोत्सव यांसारखे अनेक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे होतात. तसाच उत्साह हा माघी गणेशोत्सवासाठी ठाणेकरांमध्ये कायम आहे. यंदा माघी गणेशोत्सवासाठी प्रत्येक मूर्तिकाराकडे १५ ते २० गणेश मूर्तीचे बुकिंग झालेले आहेत. मातीच्या मूर्ती १५०० ते ३५०० रूपयांपर्यंत तर पिओपी च्या १२०० ते १३००रूपयांपर्यंत आहेत.यात शाडू व मातीच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. यामध्ये यंदा दीड ते अडीच फूटाच्या गणेश मूर्तींना मागणी असल्याचे मुर्तीकार आनंदा कुंभार यांनी सांगितले.

Maghi Ganeshotsav thane
Thane News : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नविन बॅनरची चर्चा

आयुक्तालयात स्थापन होणार्‍या गणेशमुर्त्या

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या पाचही परिमंडळांमध्ये मोठया उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे यामध्ये सर्वाधिक घरगुती गणपतींची स्थापना भिवंडी परिमंडळात होणार आहे. ठाणे- घरगुती ३३६ तर सार्व २२, भिवंडी घरगुती ६९३ तर सार्व ६, कल्याण- घरगुती ३२३ तर सार्व ६६, उल्हासनगर घरगुती २५९ तर २६ आणि वागळे- घरगुती १६५ तर सार्व २९ अशी गणपती मुर्तींची स्थापना होणार आहे.

Maghi Ganeshotsav thane
Thane Crime News: बदलापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 32 इंची टीव्ही चोरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.