मुंबईः महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळल्यानंतर तब्बल ४० तासांनंतर शोधकार्य बुधवारी दुपारी पूर्ण झालं. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन पाच मजली निवासी इमारत कोसळली. यात १९ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी या चार वर्षीय मुलाला वाचवण्यात यश आलं. यानंतर आता या चिमुकल्याचं पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे.
महाड इमारत दुर्घटनेत आपलं संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांसाठी एकनाथ शिंदे धावून आलेत. मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन चिमुरड्यांची नावे आहेत. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येणारेत.
तब्बल १९ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात NDRF च्या पथकाला यश आलं होतं. मात्र त्याची आई आणि दोन बहिणींचा यात मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला. मात्र, त्याचं संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेचं बळी ठरलं. त्याचं आई-वडिलांचं छत्र हरपलं. मोहम्मद आणि अहमद दोघांचं आई-वडिलांचं छत्र नसल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं.
या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसंच दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसंच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
या दोन्ही लहान मुलांचं पालकत्व स्वीकारण्यामागे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याचं प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यामुळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
Mahad Building collapsed Shivsena Leader Eknath Shinde take responsibility two child
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.