Mumbai News : महादेव बेटिंग ॲप प्रकरण: ‘ईडी’चे मुंबईसह 5 ठिकाणी छापे

महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी ईडीने मुंबईतील चित्रपट निर्मिती संस्थेशी संबंधित ठिकाणावर शनिवारी छापेमारी केली
Mahadev Betting App Case ED raids 5 places including Mumbai
Mahadev Betting App Case ED raids 5 places including MumbaiSakal
Updated on

मुंबई : महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी ईडीने मुंबईतील चित्रपट निर्मिती संस्थेशी संबंधित ठिकाणावर शनिवारी छापेमारी केली आहे . याशिवाय देशभरात 5 ठिकाणीही छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट निर्मिती संस्थेला महादेव अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून आर्थिक मदत मिळाल्याचा ईडीला संशय आहे.

याबाबत अंधेरीतील चित्रपट निर्मिती संस्थेच्या ठिकाणावर शोधमोहीम राबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी मुंबई, छत्तीसगड, दिल्ली या ठिकाणीही ईडीने शोधमोहीम राबवली. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान 50 हून अधिक बेटिंग अ‍ॅप्लिकेशन सुरू असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. ॲपच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकारांसह परदेशी खेळाडूंनीही जाहिराती केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी रणवीर कपूर, श्रद्धा कपूरसारख्या सेलिब्रिटींना ईडीने तपासासाठी समन्स धाडले होते.

प्रकरण थोडक्यात

छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ॲपचे प्रवर्तक आहेत. ईडीने केलेल्या कारवाईत तब्बल 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले आहे. फेब्रुवारी 2023 कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्रकार यांच्या विवाह सोहळ्यासाठी अभिनेता रणबीर कपूर,टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.

या बदल्यात हवालामार्फत सेलिब्रिटींना रक्कम दिल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी 18 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 13 कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत. याशिवाय भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचीही नावे तपासात उघड झाली आहेत. संशयीत कलाकारांनी हवालामार्फत पैसे स्वीकारल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी यापैकी अनेक सेलिब्रिटींना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.