Mahaparinirvan Din : चैत्यभूमीवर राजकीय पक्षांची चढाओढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज राजकीय पक्षांची चढाओढ सुरू होती.
chaitya bhoomi mumbai
chaitya bhoomi mumbaisakal
Updated on

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज राजकीय पक्षांची चढाओढ सुरू होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महापरिनिर्वाण दिन असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते चैत्यभूमीपुढे नतमस्तक झाले. दलितांची मोठी व्होट बॅक असल्याने ती कॅश करण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी इंदू मिलवर होत असलेल्या स्मारकाराचा उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनीली इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम वेगात सुरू असून या स्मारकाचे काम पुढच्या वर्षी पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

इंदू मिलच्या स्मारकासाठी आंदोलने झाली. त्यामुळे हे स्मारक आंबेडकरी जनतेचा भावनिक प्रश्न झाला आहे. या नेत्यांनी इंदू मिलच्या भावनिक मुद्दा अधोरेखित केला आले. त्यामुळे स्मारकाच्या प्रश्नाचे भांडवल आगामी निवडणुकीत केले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जावून अभिवादन केले. ते मुख्यमंत्री असताना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चैत्यभूमीवर जावून अभिवादन केले. राज्य सरकारने यंदा पहिल्यांदाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर करून त्याचे श्रेय सरकारने घेतले आहे. ही मागणी करून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आपल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा दावा त्यांनी केली आहे. सुट्टी जाहिर केल्यामुळे यंदा चैत्यभूमीवर गर्दी वाढल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेद्र आव्हाड तसेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनीही चैत्यभूमीवर जावून अभिवादन केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची चैत्यभूमी येण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.