मला पाडून दाखवा, भर सभागृहात अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं चॅलेंज

मला पाडून दाखवा, भर सभागृहात अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं चॅलेंज
Updated on

मुंबईः आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्षात चांगलची जुंपली आहे. आज सभागृहात  सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी  पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यावर विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते.  त्यांनी चौफेर टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढण्यास सुरुवात केली. 

भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले. तसंच त्याचदरम्यान मुनगंटीवार बोलत असताना  कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला. त्यानंतर आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना मी तुमचं आव्हान मी स्वीकारतो मला पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं.

अजित पवार हे त्यांच्या समोरचं बसले होते. खुमासदार टोला लगावत तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा असं अजितदादा म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली.

अजित पवार म्हणाले की, मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करून दाखवले आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. 
 
जुलै महिन्यात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजींचा वाढदिवस असतो. त्यामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्याचे विचार पुढे नेले पाहिजे असं राशीत लिहिलंय. माझ्यासमोर आज बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणे होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा एक कर्मचारी हा कॉम्प्युटर पुसत होता. त्याला विचारले असता तो म्हणाला कॉम्प्युटर जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, कॉम्प्युटरलाही रडू फुटले असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Maharashtra Assembly 2020 Winter session ajit pawar accepted sudhir mungantiwar challenge

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.