ठाणे - विधानसभा निवडणुकीत चौकार, षटकार मारत महायुतीच विधानसभेचा सामना जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मोठे शक्तिप्रदर्शन करत कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वागळे इस्टेट, मॉडेला चेकनाका येथील दत्त मंदिर ते किसन नगर आयटीआय इमारतीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.