मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५८ हून अधिक जागांवर विजय आणि आघाडी मिळवत आपलीच खरी शिवसेना असल्याचे आज जनतेच्या दरबारात सिद्ध केले. विधानसभेत ५० आमदारांपैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन असे विधान शिंदे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची उद्धव ठाकरे यांच्या पक्षच्या नेत्यांनी खिल्लीही उडविली होती. मात्र, शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या एकत्रित जागांपेक्षाही शिवसेनेने अधिक जागा मिळविल्या आहेत.