Uddhav Thackeray: ठाकरे गटाचा विधानसभेसाठी मास्टर प्लॅन! 120 पेक्षा अधिक जागांचा आढावा, समसमान वाटप झाल्यास...?

Maharashtra Assembly Elections: उद्धव ठाकरेंनी मुंबई, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा संदर्भात आपल्या नेत्यांकडून विस्तृत आढावा घेतला.
Uddhav Thackeray news
Uddhav Thackeray newsesakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत विधानसभेच्या ठाकरेंची ताकद असलेल्या जागांवर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणूक लढवताना ठाकरे गट ज्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद आहे ते मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही असेल.

120 पेक्षा अधिक जागांचा आढावा-

या बैठकीत 120 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास 90 ते 100 जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार देईल. ठाकरे गटाचे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या ठिकाणी संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याची गरज आहे, असे बैठकीत चर्चा झाली.

मुंबई, मराठवाडा, कोकणातील रणनीती-

उद्धव ठाकरेंनी मुंबई, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा संदर्भात आपल्या नेत्यांकडून विस्तृत आढावा घेतला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी आघाडी मिळाली आहे, त्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करण्यात आला.

Uddhav Thackeray news
Firing at a Shia mosque: ओमानच्या मस्कत शिया मशिदीजवळ गोळीबार! सहा ठार, एका भारतीयाचा समावेश

महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर निर्णय-

महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असताना, 288 विधानसभा क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्याची रणनीती ठरवली जाणार आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या एकत्रित होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यानंतर लवकरच विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्मुलावर अंतिम निर्णय होणार आहे.

ठाकरे गटाच्या या बैठकीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या रणनीतीची स्पष्टता आली आहे. महाविकास आघाडीतील समसमान वाटपाच्या मुद्यावर सध्या ठाकरे गटाचा जोर दिसून येतो.

Uddhav Thackeray news
Dombivli News: मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com