मुंबईः सध्या महाराष्ट्र राज्या कोरोना सारख्या व्हायरसचा सामना करत आहेत. राज्य सरकार या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करताहेत. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बरेच निर्णय घेत आहे. येत्या २७ जुलैला मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे. अशातच कोरोनाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसंच आपल्या कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन देखील केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सर्वच शिवसैनिकांसाठी नेहमीच मोठा असतो. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीच शिवसैनिक आणि हितचिंतकांची मातोश्री निवासस्थानी रांगा लागलेल्या असतात. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहत उद्धव ठाकरेंनी आधीच या संदर्भात सर्वांना आवाहन केलं आहे.
यंदा मी वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळं कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसंच, हारतुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. कुठेही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावू नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिक आणि हितचिंतकांना केलं आहे.
गेल्या ४ महिन्यांभरापासून राज्य सरकार हे नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई आपण लढत आहोत आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
दरम्यामा कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे असं म्हणत 'वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान,प्लाझ्मा दान करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray not celebrate 60th birthday
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.