मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची २३ मार्चला कोविड १९ संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आली होती. त्यानंतर आज त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. रश्मी ठाकरे यांना नेमकं कशासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलयं, ते अजून स्पष्ट झालेलं नाही.
पोस्ट कोविड तपासणीसाठी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची शक्यता आहे. कोरोना होऊन गेल्यानंतरही शरीरावर त्याचे काही परिणाम होतात. त्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे आवश्यक असते. रश्मी ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेकांना या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज काँग्रेसचे नेते आणि प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे खाटांची संख्या अपुरी पडत आहे. पुरेशा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स अभावी स्थिती गंभीर होऊ शकते.
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या लॉकडाउनमुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात आणता येते. पण त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान प्रचंड असते. अनेकांचा रोजगार हिरावला जातो. बेरोजगारी वाढते. त्यामुळे लॉकडाउन करण्यावरुन मतमतांतरे आहेत. काही राजकीय पक्षांचा या लॉकडाउनला प्रखर विरोध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.