Salman Khan:
मुंबई, ता.१६: अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान याच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. सलमानचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील यावेळी उपस्थित होते.
या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेची हमी दिली. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासनही दिले असल्याचे समजते.
आम्ही बिश्नोईला संपवू-
सलमानच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
‘‘इथे मुंबई पोलिस आहेत. हा महाराष्ट्र आहे. इथे कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही.सलमान खान तर आमचा खूप मोठा अभिनेता आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही ‘गँग’ इथे चालणार नाही. ज्यांना पकडले आहे, त्यांचा तपास सुरू आहे. मुळापर्यंत तपास होईल. आरोपींवर कारवाई केली जाईल. नागरिकांची संरक्षण हे आमचे काम असून, आम्ही ते करणार, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.