मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्याला संबोधन
मुंबई: सध्या देशात काही दिवसांनी तिसरी लाट येणार असल्याची चर्चा आहे. या लाटेला घाबरण्याचे कारण नाही. महाराष्ट्राने त्याबद्दलची तयारी आता सुरू केली आहे. रेमडेसिव्हिरबद्दल राज्य आता अधिक नियोजनबद्ध पद्धतीने विचार करत आहे. तसेच, ऑक्सिजनच्या साठ्याबद्दलची सकारात्मक पद्धतीने विचार सुरू आहे. मिशन ऑक्सिजन महाराष्ट्राने हाती घेतलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी राज्याने तयारी सुरू केली असून यासाठी राज्य सज्ज आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. बुधवारी रात्री त्यांनी राज्याच्या जनतेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगितले. (Maharashtra CM Uddhav Thackeray says State is ready for Third Wave)
"तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. आधीपासून आपण जी काही शिस्त पाळतोय, तेच नियम आपण कायम पाळण्याची गरज आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी राज्य ६ हजार कोटी रूपये एक रकमी चेकने घेण्याची तयारी दाखवत आहे. आपण हा वेग १० लाखांहून अधिक पुढे नेऊ शकतो. पण लसींचा तुटवडा हा मोठा मुद्दा आहे. मी केंद्रावर आरोप करत नाही. केंद्राचीही काही अडचण असूच शकत नाही. लसीचे उत्पादन हळूहळू होत आहे. त्यामुळे जसजसा लस पुरवठा वाढेल, तसं लसीकरण वाढवू. तिसऱ्या लाटेसाठी आपण तयारी सुरु केली आहे. दुसरी लाट लवकर थोपवायची आहेच, पण तिसरी लाट जर आलीच तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतंय", असा पुनरूच्चार केला.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचं कौतुक केलं, त्याबद्दल...
"मुंबईत कोरोनासाठी जी लढाई आपण लढतोय, त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे. पण हे आपल्या एकट्या यंत्रणेचं यश नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीनेच हे साध्य झालं आहे. मोठ्या जिद्दीने नागरिक मुंबई महापालिकेला मदत करत आहेत. आपण जे निर्बंध काही दिवसांपासून लावले आहेत, त्यामुळे रुग्णवाढ आणि रुग्णसंख्या थोडीथोडी खाली येत आहे. आपण आता धोक्याच्या वळणावर उभे आहोत. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत रुग्णवाढ थोडी कमी होत आहे. इतर राज्ये लॉकडाउन करताहेत. ही कोरोनाच्या लढ्याची आवश्यकता आहे", असेही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.