Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

नांदेड , छत्रपती संभाजी नगर , नागपूर , येथील शासकीय रुग्णालयात निष्पाप लोकांचे गेलेले बळी याला शासन जबाबदार आहे .
mumbai
mumbai sakal
Updated on

अजिंक्य धायगुडे

मुंबई - विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार , प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ,आमदार वर्षा गायकवाड , आमदार अस्लम शेख , विधान परिषदेचे आमदार भाई जगताप , आदी काँग्रेसच्या नेत्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली .राज्यपालांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून एक निवेदन देण्यात आले .

नांदेड , छत्रपती संभाजीनगर , नागपूर, येथील शासकीय रुग्णालयात निष्पाप लोकांचे गेलेले बळी याला शासन जबाबदार आहे . महाराष्ट्र राज्यातील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आलेली असून, आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे .त्याला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार आहे . त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखाची मदत करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे .

महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून कर्जबाजारीपणा आणि अस्मानी संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी पाउसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . त्याची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना भेटलेली नाही .महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड निराश आहेत . शेतकऱ्यांना उपाययोजना करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी .

mumbai
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

राज्यात बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात असताना , शासकीय सेवेतील विविध पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे . राज्यातील विविध जाती -जमातीतील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी .

mumbai
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण देखील वाढले आहे .गृहविभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील गुन्हेगारीची टक्केवारी वाढली आहे . महाराष्ट्रातील गृहविभाग कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरला आहे .

mumbai
Pune News : कोथरूडच्या शास्त्रीनगरमध्ये १७ तास बत्ती गुल!

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूची नोंद उच्च न्यायालयाने घेतली आहे .हे एक प्रकारे महाराष्ट्र शासनाचे अपयश आहे . याला वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना जबाबदार ठरवून त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा.या मागणीमुळे या दोन मंत्र्यांच्या अडचणी वाढतात की काय ? अशी चर्चा सुरू आहे. निवेदनात पुढे असे म्हंटले आहे की नमूद विषयांची गंभीर दखल घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे केली गेली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.