Maharashtra Din : मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट ; शिवाजी पार्क परिसरात कलम १४४ लागू

mumbai police
mumbai police
Updated on

मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. अशा स्थितीत त्याच दिवशी मुंबईत दहशतवादी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे, तर मुंबई पोलीस विभाग पूर्ण अलर्ट मोडवर आला आहे.

शिवाजी पार्कवर आयोजित परेड दरम्यान दहशतवादी हल्ला होऊ शकतो. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. हे लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी हे ठिकाण आणि तारीख निवडली असल्याची शक्यता आहे.

मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

शिवाजी पार्क परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कटामुळे शिवाजी पार्कचा परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून, मुंबई पोलीस विभागाच्या पथकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक संशयित व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

mumbai police
Barsu Refinery Protest : उदय सामंतांनी २०२१ मध्ये रिफायनरीला केला होता विरोध ; ठाकरे गटाचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.