बालरोगतज्ज्ञांचा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचा सल्ला

लहान मुलांना ही लस द्या....
child vaccination.
child vaccination.
Updated on

मुंबई: पावसाळा सुरु होण्याआधी प्रत्येक लहान मुलाला ताप, सर्दी, खोकला प्रतिबंधक लस देण्यात यावी, असा सल्ला राज्याच्या कोविड टास्क फोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिला आहे. लहान मुलांची आजाराविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हा त्यामागे हेतू आहे. अशा पद्धतीने लसीकरण केल्यास लहान मुलांमध्ये आजारपणाचे प्रमाण कमी होईल.

रुग्णालयात गर्दी कमी होईल तसेच साधा ताप आल्यास कोविड समजून अनावश्यक होणाऱ्या चाचण्या टाळता येतील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंना हा सल्ला दिला.

child vaccination.
लहानेंनी सांगितलं, म्युकरमायकोसिस होण्यामागचं नेमकं कारण

पाच वर्ष वयोगटाच्या आतील मुलांना ताप प्रतिबंधक लस दिली जाते. इनफ्लुएन्झा ए आणि बी असे त्यात दोन प्रकार आहेत. खासगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ही लस उपलब्ध आहे. पण ही लस राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग नाही. प्रति लसीची किंमत दीड ते दोन हजार रुपये आहे.

आगामी तिसरी लाट सौम्य राहणार असून, यामध्ये लहान मुले संसर्गित होतील असा बंदाज असला तरीही पालकांनी पाक नये. मुलांना आलेल्या शिका कोरोनाच आहे, असा समज करता डॉक्टरांना भेटा, तपासणी करा

आणि मुलांची काळज . मुलांना देण्यात येणाऱ्या विविध लशीचा डोस दिला का याची खात्री करा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञा तथा यस्क फोर्स समितीचे डॉ. सुहास प्रभू यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोगता तथा टास्क फोर्स समितीतील डॉक्टरांशी समाजमाध्यमांवर संवाद साधला. त्या वेळी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या संवादात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विजय येवले, डॉ. प्रेमानंद आंदणाकार आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.