मुंबई - विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो. संधी व गरज विचारत घेऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. महाराष्ट्र सरकारकडून एक पोर्टल तयार करण्यात आलंय. या पोर्टलच्या माध्यमातून करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून 10 हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. राज्यातील 9वी ते 12वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.
maharashtra government launches maha career portal for students read full news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.