कोविड उपचारासाठी किती दर आकारला जाऊ शकतो? पाहा सरकारचे नियम

Covid19-Treatment
Covid19-Treatmentesakal
Updated on
Summary
  • शहरांच्या वर्गवारीनुसार केली जाणार दरआकारणी

  • खासगी रुग्णालयांना अवास्तव दर लावता येणार नाहीत

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी (Treatment) खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा (Relief) देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित (Rates Finalized) करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या अधिसूचनेला मंजूरी दिली असून शहरांच्या वर्गीकरणानुसार (City Classification) दरआकारणी केली जाणार आहे. (Maharashtra Govt Finalized rates of Covid Treatment in Private Hospitals according to City Classification System)

कोविड रुग्णांकडून औषधोपचारासाठी जास्तीत जास्त किती दर आकारले जाऊ शकतात?

  • वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रती दिवस) – अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश आहे. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.

  • व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण – अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये

  • केवळ आयसीयू व विलगीकरण – अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये

अशी आहे शहरांची वर्गवारी

  • अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी)

  • ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली

  • क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तची इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

नव्या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के बेड्ससाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के बेड्ससाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.