कर्जमाफीबद्दल आणखी एक मोठी घोषणा, गृहमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात..

कर्जमाफीबद्दल आणखी एक मोठी घोषणा, गृहमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात..
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आपल्या पहिल्याच छोटेखानी मंत्रिमंडळापासून ते मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे सरकारचा फोकस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर असल्याचं दिसलं. अगदी पहिल्या दिवसापासून बैठकांचं सत्र सुरु झालं. सातत्याने  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी बैठका घेण्यात येतायत असं देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय.   

अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंतचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधातील भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली गेली. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणि भाजपच्या नेत्यांकडून या कर्जमाफीवर सातत्याने टिप्पणी केली जातेय. ज्यांचं कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकार वेगळा विचार करत असल्याचं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. 

याच दोन लाखांवरील कर्जमाफीवर आता सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीये. सरकारने जो निर्णय घेतलाय त्याचं सरकार पूर्णपणे पालन करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कोणत्या परिस्थिती कोणताही गोंधळ किंवा गडबड होऊ नये, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं पाहिजे हि सरकारची भूमिका आहे. ठाकरे सरकारचा 2 लाखांवरील कर्ज माफीबाबत विचार सुरु आहे. सध्या या कर्जाबाबत बँकांकडून आढावा घेतला जातोय.  त्यामुळे यामध्ये कुणीही कोणताही किंतु परंतु बाळगू नका असं गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  

महाराष्ट्रात शेतकरी संपवतायत आयुष्य

जेव्हा शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी एकत्र येत होती. तेव्हाच महाराष्ट्रात शेतकरी आयुष्य संपवत होते. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्याच्या काळात राज्यात 2,532 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती उघड झालीय. यात सर्वाधिक आत्महत्या विदर्भात झाल्या आहेत. विदर्भात तब्बल 1,169 शेतकर्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. तर, मराठवाड्यात 835 उत्तर महाराष्ट्रात 442, पश्चिम महाराष्ट्रात 85 तर कोकणात एका शेतक-यानं आत्महत्या केल्याची माहिती सरकारी आकडेवारीत देण्यात आलीय.

भीषण म्हणजे 2,532 मधल्या तब्बल 300 आत्महत्या राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरु असलेल्या नोव्हेंबर महिन्यात झाल्यात. मागच्या चार वर्षातला हा सर्वाधिक आकडा आहे. 

WebTitle : maharashtra home minister eknath shinde on farmers loan wavier above two lac rupees

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.