उद्योगांचे स्थलांतर टाळण्यासाठी गुंडगिरी थांबवा, 'या' इंडस्ट्रीची मागणी

industry
industrySakal media
Updated on

मुंबई : महाराष्ट्राचा (Maharashtra) औद्योगिक विकास (industrial development) व्हायचा असेल आणि राज्यातील उद्योगांचे परराज्यात स्थलांतर (business shifting) नको असेल तर औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरी संपविण्यासाठी (criminal culture) त्वरेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरतर्फे करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील उद्योजक व महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष राम भोगले यांच्या कंपनीत काही गुंडांनी शिरून तेथील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. हे असे प्रकार राज्याच्या औद्योगिक वाढीला घातक आहेत, असे चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य मानले जाते. त्यात औरंगाबाद औद्योगिक क्षेत्र हे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार देणारे अतिशय महत्वाचे केंद्र आहे.

industry
दिवेकर लसीकरणापासून वंचित ; केंद्र वाढवण्यासाठी सेना भाजपात रस्सीखेच

या औद्योगिक क्षेत्रातील शांतता, औद्योगिक स्वास्थ्य आणि सुरक्षितता भंग करण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले असल्याने त्याचा तेथील उद्योजक व व्यापारी वर्गाने मोठा धसका घेतला आहे. औरंगाबादच्या औद्योगिक व एकंदरित विकासासाठी सतत कार्यरत असलेले राम भोगले यांच्या कंपनीत घुसून तेथील अधिकारी, कर्मचारी यांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली. या गुंडांची हिंमत किती वाढली आहे हे स्पष्ट करणारी ही घटना असल्याची टीकाही चेंबरतर्फे करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे दिसणारी गुंडगिरी राज्यातील ठाणे, नाशिक आणि इतरही औद्योगिक क्षेत्रातही यापूर्वीही अनुभवास आली आहे. राज्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रात दिसणारी ही गुंडगिरी अजूनही थांबली नाही. राज्य सरकारने याची अत्यंत गंभीरपणे दखल घेवून अशा गुंडगिरीचा तातडीने समूळ नाश करावा. औरंगाबाद व सर्व औद्योगिक क्षेत्रांमधील वातावरण उद्योगस्नेही, विकासोन्मुख राहिल याची दक्षता घ्यावी. जर महाराष्ट्राची ख्याती उद्योग प्रतिकूल म्हणून पसरली तर राज्याचा औद्योगिक विकास मोठ्या अडचणीत येईल हे निश्चित. महाराष्ट्रातील उद्योग तर राज्यात जावू नयेत यासाठी सर्व प्रयत्न करून ही गुंडगिरी संपवावी, असेही आवाहन चेंबरतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.