Sanjay Raut : जमीन न देण्याचा ठराव मांडणार; संजय राऊत

‘महाराष्ट्राची एक इंचही जमीन कुठल्याही राज्याला देणार नाही,’ असा ठराव विधीमंडळात मांडला जाणार
Maharashtra karnataka dispute resolution not to give land sanjay raut mumbai
Maharashtra karnataka dispute resolution not to give land sanjay raut mumbaiSakal
Updated on

मुंबई : ‘महाराष्ट्राची एक इंचही जमीन कुठल्याही राज्याला देणार नाही,’ असा ठराव विधीमंडळात मांडला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (ता. २६) हा ठराव मांडला जाईल.

सीमावादासंबंधी गेल्या काही दिवसांत सुरु असलेल्या वादात कर्नाटकने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यासंबंधात केलेल्या विधानांची महाराष्ट्राने दखल घेतलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षाने सातत्याने केला आहे. विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या आणि पुढच्या आठवड्याचे कामकाज उद्या सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ‘बाँब’ फोडला जाईल, अशी घोषणा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. या आरोपाच्या दिवशीच सीमावादाला विरोध करणारा ठराव सत्ताधारी पक्षातर्फे मांडला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()