Maharashtra Unlock: नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन

शासन आणि प्रशासन यांच्यातच लॉकडाउन, अनलॉकवरून गोंधळ
Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray
Updated on
Summary

शासन आणि प्रशासन यांच्यातच Lockdown, Unlock वरून गोंधळ

मुंबई: राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून हळूहळू पाच लेव्हलच्या वर्गवारीनुसार (5 Level District System) विविध जिल्ह्यांतील लॉकडाउन (Lockdown) उठवला जाईल, अशी घोषणा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. या घोषणेला काही तासही झाले नसताना, राज्यातील निर्बंध हटविण्यात (Unlock) आलेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे कळवण्यात येतील, अशी माहिती राज्य शासनाकडून (DGIPR) देण्यात आली आहे. (Maharashtra Lockdown New Rules Unlock Guidelines are not yet approved DGIPR informs)

Uddhav-Thackeray
राज्य पाच टप्प्यात अनलॉक होणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयीचे धोरण निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

Uddhav-Thackeray
मोठी बातमी - हॉटेल, मॉल्स, दुकानं, लोकल ट्रेन सुरु होणार पण...

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल.स्थानिकप्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.