Maharashtra Unlock: मुंबईचा समावेश तिसऱ्या गटातच- महापौर

मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वाधिक; पॉझिटिव्हिटी रेट ५.३० टक्के
Maharashtra Unlock: मुंबईचा समावेश तिसऱ्या गटातच- महापौर
Updated on
Summary

मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वाधिक; पॉझिटिव्हिटी रेट ५.३० टक्के

मुंबई: महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनबद्दलची (Maharashtra Lockdown) नवी नियमावली (New Guidelines) जाहीर केली. यातील काही निकषांवरून मुंबईचा (Mumbai) समावेश नक्की कोणत्या टप्प्यात (Level) या बद्दलचा संभ्रम होता. पण मुंबईचा समावेश हा सध्या तिसऱ्याच टप्यात (Third Level) आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO Maharashtra) सायंकाळी पुन्हा आकडेवारी जाहीर केली जाईल. नियम (Rules) नक्की काय व कसे हे सांगितलं जाईल आणि त्यानंतर तपशीलवार नियमावली (Detailed Notification) मुंबई महापालिका जाहीर करेल, अशी माहिती महापौरांनी दिली. (Maharashtra Lockdown Unlock Notification Mumbai comes under third level says Mayor Kishori Pednekar)

Maharashtra Unlock: मुंबईचा समावेश तिसऱ्या गटातच- महापौर
मनसुख हिरेनला विष देण्यात आलं होतं का? तपासात सत्य उघड

"ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेच्यानुसार जरी मुंबई दुसऱ्या गटात असली तरी मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट हा पाचपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटातच मोडते", असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले. "मुख्यमंत्री कार्यालाकडून सायंकाळी पुन्हा आकडेवारी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महापालिका प्रशासन मुंबईसाठीच्या नियमांचे परिपत्रक जाहीर करेल", असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे. तसेच, मुंबईतील बेड ३५ टक्के भरलेले आहेत, हेदेखील त्यांनी नमूद केलं.

BMC-Mumbai
BMC-Mumbai
Maharashtra Unlock: मुंबईचा समावेश तिसऱ्या गटातच- महापौर
आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले; सह्याद्री गेस्ट हाऊसवरील घटना

ग्लोबल टेंडर्स रद्द झाल्याबद्दल...

"ग्लोबल टेंडर्सच्या बाबतीत वेगळी बाब समोर आली. येणाऱ्या निविदांमध्ये लस बनवणाऱ्या कंपन्या टेंडर भरतील अशी पालिकेची अपेक्षा होती पण लसपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी टेंडर भरले. त्यामुळे आम्हाला ही सर्व टेंडर्स रद्द करावी लागली. सध्या डॉ. रेड्डीज या कंपनीशी सकारात्मक बातचीत सुरू आहे", असे पेडणेकर यांनी सांगितलं. "आम्हाला लोकांना वाचवायचं आहे. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्याउलट आम्ही प्रत्येकाला कामातून उत्तर देऊ. देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्ट्रेशनमधून मुंबई महापालिकेवर टीका केली असेल", असा टोलादेखील त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.