Mantralay News: मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानं खळबळ!

संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानं हे पाऊल का उचललं याची माहिती देखील समोर आली आहे.
Mantralay
MantralayeSakal
Updated on

मुंबई : कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीनं थेट मंत्रालयात धाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यानं स्वतःच्या शरिरावर धारदार ब्लेडनं वार करुन घेतल्याचं प्राथमिक माहितीतून कळतं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. (Maharashtra Mantralay News Suresh Jagtap suicide attempt outside Devendra Fadnavis office)

Mantralay
Ramesh Bais: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

सुत्रांच्या माहितीनुसार, सुरेश जगताप असं या ४६ वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो मूळचा साताऱ्यातील फलटणाचा रहिवासी आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या व्यक्तीनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. (Marathi Tajya Batmya)

Mantralay
ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांचं निधन; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

२ ऑगस्टच्या दुपारी सुरेश मंत्रालयातील पास घेऊन ६ व्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरील लॉबीत आला. यावेळी कुणाला काही कळायच्या आत त्यानं स्वत:जवळील कटरने स्वत:च्या डाव्या मनगटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीनं जीटी रुग्णालयात हालवलं. (Latest Marathi News)

Mantralay
Nuh Violence : मी शिवभक्त तरी, हिंदुत्ववाद्यांनी माझं दुकानही सोडलं नाही; दुकान मालकाची प्रतिक्रिया

दरम्यान, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात सुरेश जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ४१ 'अ' १ अन्वेय अंतर्गत नोटीही जारी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मरीनड्राइव्ह पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.