मुंबई: "काल सभागृहात घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणारं आहे. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आपण देतो. पण हल्ली जे काही चाललेलं आहे. ते पाहून दर्जा खालावत चाललेला आहे. लोकप्रतिनिधींकडून (elected representative) जनतेची अपेक्षा असते. काल जे दृश्य बघायला मिळालं, ते शरमेने मान खाली जावं असं दृश्य होतं. जबाबदार पक्षाकडून घडलं. आम्ही घडवलेलं नव्हतं" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले. (Maharashtra monsoon assembly session 2021 chief minister uddhav thackeray address media)
"वेडवाकड वागणं, आरडाओरडा करणं हे लोकशाहीचं लक्षण नाही. भास्कररावांनी संपूर्ण वर्णन केलं, ते ऐकल्यानंतर शिसारी याव असं वर्तन महाराष्ट्रात घडू शकतं, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही" असं मुख्यमंत्री म्हणाले.
"पोस्टकोविड आर्थिक परिस्थिती काय असेल? अस्वस्थतता आहे. कोरोनामध्ये वाचायचं कसं आणि वाचल्यानंतर करायचं काय? ही चिंता आहे. दोन दिवसात आम्ही जनतेला समाधान वाटेल असं काम केलं, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. "तुम्ही सहमत व्हा, नका होऊ, पण त्याबद्दल वेडवाकडं वागणं सभागृहात योग्य नाही. आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणे नाहीत. हा पायंडा पडायला नको. दोन दिवसात एवढं काम करणं, राज्याच्या हिताच काम करणं महत्वाचं आहे. उपस्थित सदस्यांना धन्यवाद देतो. ज्यांच्यांकडून जे घडू नये, ते घडलं त्यांनी सुधारावे" अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
"सरकारचं कर्तव्य आहे जनतेचा समाधान करणं. विरोधी पक्षाचं समाधान कशाने होणार? हे त्यांच्यावर आहे" असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार अशी चर्चा सुरु झालीय, त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ३० वर्ष एकत्र राहून काही झालं नाही, तर आता काय होणार, असं उत्तर दिलं.
विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवर मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्रात सध्या जी स्थिती आहे, कोरोना चाचणीसाठी नियम आहेत. ग्रामीण भागातून येणारे लोकप्रतिनिधी आहेत. अध्यक्ष निवडीसाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. जेव्हा परिस्थिती थोडी आटोक्यात येईल असं वाटेल, तेव्हा निवडणूक घेऊ" विरोधी पक्षांनी राजकारण केलं. तरी आम्ही या वाईट स्थितीत राजकारण करणार नाही. आपण लस विकत घेण्याची तयारीही ठेवली होती पण पुरवठ्याअभावी ते शक्य झालं नव्हतं असं मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.