Monsoon Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआत धुसफूस; राष्ट्रवादीवर काँग्रेसची नाराजी?

Ajit Pawar Latest Update : अजित पवार समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरला गेले आहेत.
 jayant Patil
jayant Patilesakal
Updated on

Mumbai News : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत धुसफूस पहायला मिळाली. त्यानुसार जयंत पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष नराज असल्याची चर्चा आहे. नेमकं कारण काय? जाणून घेऊयात. (Maharashtra Monsoon session Congress upset with Jayant Patil whose party NCP not participated in aggitaion agaist govt)

 jayant Patil
CJI Chandrachud: आता ट्रेन कुठल्या स्टेशनवर थांबवायची हे पण सुप्रीम कोर्टानंच सांगायचं का? CJI चंद्रचूड भडकले

आंदोलनात सहभाग नाही

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीनं विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून हातात फलक घेत सरकारविरोधात आंदोलन केलं. पण या आंदोलनात केवळ काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदारचं उपस्थित होते. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला नाही. त्यामुळं काँग्रेसनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

 jayant Patil
Monsoon Session: नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे अपात्र होणार का? अनिल परबांनी सांगितली कायदेशीर बाजू

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवर भेटीसाठी गेले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत.

त्यामुळं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.