असं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'शॅडो कॅबिनेट' ; वाचा संपूर्ण यादी

असं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'शॅडो कॅबिनेट' ; वाचा संपूर्ण यादी
Updated on

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिवस आहे. मनसेचा यंदाचा १४ वा वर्धापन दिन आहे. यंदा प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईबाहेर वर्धापन दिवस साजरा केला जातोय. नवी मुंबई निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा कार्यक्रम वाशीमधल्या विष्णुदास भावे सभागृहात साजरा करण्यात येतोय असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आजच्या वर्धापन दिनाला पार्श्वभूमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलेल्या झेंड्याची आणि अजेंड्याची.

आजच्या वर्षापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाच्या अशा शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. शॅडो कॅबिनेटमध्ये कुणाला कोणत्या खात्यांवर नजर ठेवायची आहे याबाबतची यादी मनसे नेते अनिल शिदोरे यांनी वाचून दाखवली.   

मनसेचे 'हे' मंत्री ठेवणार 'या' खात्यांवर नजर

  1. गृह, विधी व न्याय, जलसंपदा आणि सामान्य प्रशासन - बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उंबरकर, राहुल बापट, अवधूत चव्हाण, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, डॉक्टर अनिल गजने, ऍडव्होकेट रवींद्र , ऍडव्होकेट दीपक शर्मा आणि ऍडव्होकेट जमील देशपांडे 
  2. जलसंपदा खात्याची विशेष जबाबदारी - अनिल शिदोरे 
  3. मराठी भाषा माहिती तंत्रज्ञान -  अमित ठाकरे, अनिल शिदोरे, अजिंक्य तोपदे 
  4. वित्त नियोजन, गृहनिर्माण आणि  उद्योग - नितीन सरदेसाई,  हेमंत चंगूस (उद्योग )  वसंत फडके, मिलिंद प्रधान, पियुष खेडा, प्रितेश बोऱ्हाडे, वल्लभ पिटले, पराग शिंत्रे 
  5. वित्त नियोजन विशेष जबाबदारी - अनिल शिदोरे 
  6. महसूल - अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईमकर, अजय महाले,  संदीप पाचंगे, श्रीधर जगताप 
  7. ऊर्जा - शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे 
  8. ग्रामविकास - ऍड. जयप्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे, परेश चौधरी, प्रकाश भोईर अनिल शिदोरे , सुरेश शिंदे 
  9. वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन - संजय चित्रे, अमित ठाकरे, सारस्वत, संतोष धुरी  धुरू, आदित्य दामले आई ललित यावलकर 
  10. शिक्षण (शालेय, उच्च तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण) - अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर (विशेष उच्च शिक्षण ) सुधाकर तांबोळी, केतन पेडणेकर, बिपीन नाईक, अमोल रोगे.   
  11. कामगार - राजेंद्र वागसकर , गजानन राणे आणि सुरेंद्र सुर्वे  
  12. नगरविकास आणि पर्यटन - संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरूलकर, कीर्तिकुमार शिंदे, उत्तम सांडव, हेमंत कदम, योगेश चिले, संदीप कुलकर्णी, फारुख डाला 
  13. सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब कल्याण - रिटा गुप्ता, कुंड राणी  
  14. सहकार आणि पणन - दिलीप धोत्रे , कौस्तुभ लिमये वल्लभ चितळे आणि जयदेव कर्वे 
  15. अन्न आणि नागरी पुरवठा - राजा चौगुले, महेश जाधव, वैभव माळवे, विशाल पिंगळे 
  16. मत्स विकास आणि बंदरे - परशुराम उपरकर, चव्हाण आणि निशांत गायकवाड. 
  17. महिला बालविकास - शालिनी ठाकरे आणि सुनीता चुडी 
  18. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम सोडून)  - योगेश परुळेकर, अभिषेक सप्रे, सीमा शिवलकर   
  19. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम धरून) - संजय शिरोळकर
  20. रोजगार हमी आणि फलोत्पादन - बाळा शेडगे,आशिष कोरी 
  21. सांस्कृतिक कार्य राजशिष्टाचार - अमेय खोपलर,  
  22. कृषी दुग्धविकास - संतोष नागरवाजे , संजीव पाखरे, अमर कदम  
  23. कौशल विकास उद्योजकता - स्नेहल जाधव 
  24. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक इतर मागास प्रवर्ग , भटक्या जाती आणि कल्याण -  गजानन काळे, ऍडव्होकेट संतोष सावंत, अनिल करपे 
  25. ग्राहक संरक्षण - प्रमोद पाटील 
  26. राज्य उप्त्पादन शुल्क - वसंत फडके 
  27. आदिवासी विकास - आनंद इम्बडवात, किशोर जाचप, परेश चौधरी
  28. पर्यावरण - रुपाली पाटील, कीर्तिकुमार शिंदे, जयेश शृंगारपुरे आणि देवव्रत पाटील 
  29. खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन - अनिश माजगावकर 
  30. पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वछता - अरविंद गावडे 
  31. क्रीडा व युवक कल्याण - विठ्ठल लोकणकर , अरुण जांभळे  
  32. अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ - इरफान शेख , सईद शेख, जावेद शेख, जालीम तडवी, अल्ताफ खान  

नोट : नावांमध्ये बदल झाल्यास सदर बदल अपडेट केले जातील 

maharashtra navanirman sena declared shadow cabinet on their foundation day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.