ठाणे : अंबरनाथमध्ये मनसे नेत्यांकडून पुन्हा एकदा दादागिरिचा प्रकार समोर आलाय. मनसेच्या विधानसभा उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आलीये. सुमेध भवेर असं या मनसे नेत्याचं नाव आहे. सुमेध भवेर यांनी विधानसभा विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून मनसेमद्धे प्रवेश केला होता. मात्र निवडणुकांमध्ये या मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाल्यामुळे भवेर चांगलेच नाराज होते.
मोठी बातमी - 'ती' बंद करायला विसरली; अन् त्याने...
राज ठाकरे याना शिवीगाळ केला म्हणून..
वादाची ठिणगी पडली राज ठाकरे यांना करण्यात आलेल्या शिवीगाळवरून. म्हणून सचिन अहिरेकर या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मनसेचे नेते सुमेध भवेर यांनी मारहाण केली आहे. भाजपात असताना सचिन अहिरेकर स्वीय सहाय्यक म्हणून सुमेध भवार यांच्यासाठी काम करत होते. पण सुमेध भवेर मनसेत गेल्यानंतर त्यांनी हे काम बंद केलं होतं.
मोठी बातमी - कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...
अंगरक्षकांसोबत केली मारहाण..
सचिन अहिरेकर यांनी सुमेध भवेर आणि त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय. तसंच डोक्यात दगड घालण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. सचिन अहिरेकर हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ अध्यक्ष आहेत. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. पोलिसांनी सुमेध भवेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल
आधीच मनसे आणि इतर पक्षांमध्ये वाद आहेत. अशात आता राज ठाकरे यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपामुळे ही मारहाण झाल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या संबंधी गुन्हा दाखल केलाय. सुमेध भवेर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहून महत्त्वाचं आहे.
maharashtra navanirman sena party leader attacked NCP leader in ambernath
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.