Dahi handi 2021 : डोंबिवलीत मनसे मवाळ

कल्याण डोंबिवलीत मात्र शांतीच्या भूमिकेत
dahihnadi
dahihnadisakal
Updated on

डोंबिवली : ठाण्यानंतर (thane) डोंबिवलीकडे (dombivli) मनसे (MNS) कार्यकर्त्यांचा आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जाते. दहिहंडी साजरी करण्याच्या निर्णयावरून ठाण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना, कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी मात्र शांततेची भूमिका घेत, ठाण्याला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे.कल्याण डोंबिवलीत विरोधी पक्ष म्हणून नेहमीच मनसेने आपली आक्रमक भूमिका दाखवली असताना त्यांची ही शांत भूमिका का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने दहीहंडी उत्सवावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाला न जुमानता मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जोरदार तयारी केली. त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असतानाही मनसे कार्यकर्ते दहीहंडी साजरी करणारच या भूमिकेवर ठाम आहेत. ठाण्यात मनसे आक्रमक असताना कल्याण डोंबिवली तील मनसे पदाधिकाऱ्यांनी मात्र हंडी उसत्व साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

dahihnadi
चिंताजनक! लशींचे सुरक्षा कवच भेदणारा व्हेरिएंट आढळला

मनसे पक्षाचे पक्षस्थापने पासूनच कल्याण डोंबिवली एक वेगळेच वजन राहिले आहे. पक्षाच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून आणत विरोधी पक्ष म्हणून आपली ताकद दाखवली आहे.सध्या सत्तेत भाजपा विरोधी पक्षात दाखवत असली तर गेले अनेक वर्षे केडीएमसी मध्ये सत्तेमध्ये राहिली आहे.त्यामुळे विरोधीपक्ष म्हणून मनसेचाच बोलबाला अधिक आहे. तर मनसे पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील हेही कल्याण ग्रामीण भागातून निवडून आल्याने मनसेची ताकत वाढल्याचे दिसून येत आहे.

dahihnadi
Paralympics Update: भारताच्या खात्यात 2 गोल्डसह 8 मेडल

गेल्या वर्षा पासून मनसे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. असेअसले तरीसुद्धा कल्याण-डोंबिवली मधील मनसे शहराध्यक्ष शांततेच्या भुमिकेत दिसतात. विरोध करण्यापेक्षा शहरातील विकासकामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी पाठपुरावा करणे, समाजातील विविध घटकांना लस उपलब्ध करून देणे, पूरग्रस्तांना मदत, कोकणवासीयांसाठी गणपती बससेवा याकडे आपले लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसते.

dahihnadi
पुणे-कोल्हापूर प्रवास अडीच तासांत; केंद्राची वेगवान योजना

"डोंबिवलीतील चार रस्त्यावरील पारंपरिक हंडी गेल्यावर्षी प्रमाणे रद्द करण्यात आली आहे. कोरोना निर्बंधातून बाहेर पडायचे तर सर्वांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असून सध्या त्याकडे मनसेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. आमदार राजू पाटील हे स्व खर्चातून लसीकरण मोहीम राबवित आहेत. ते पूर्ण झाले की सण उत्सव दणक्यात साजरे करू. जन आशीर्वाद यात्रा, शिव संपर्क अभियानमधील गर्दीवर निर्बंध नसतात, मात्र सणांवर निर्बंध घातले जात आहेत याचा विचार झाला पाहिजे. कल्याण डोंबिवलीत दहीहंडी उत्सव होणार नाही, मात्र आम्ही ठाणे येथे जाऊन उत्सव साजरा करणार आहोत."

- मनोज घरत, डोंबिवली शहर अध्यक्ष मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.