मुंबईः वाढीव बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. नुकतीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावेळी नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आज वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेनं बैठक घेतली. या बैठकीत वीज बिलासंदर्भात आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे.
या बैठकीनंतर मनसे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात असल्याचं म्हणत सरकारनं दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता, असं नांदगावकर म्हणालेत. तसंच दिलेला शब्द पाळणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
वाढीव वीजबिलांवरुन मनसेनं सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत निर्णय घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करु, असा धमकीवजा इशारा मनसेनं राज्य सरकारला दिला आहे. वीज बिलात सवलत न देणं हा जनेतचा विश्वासघात आहे. त्यामुळे वीज कनेक्शन कापाल, तर याद राखा, असंही मनेसनं म्हटलं आहे. तसंच काही उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असंही मनसेनं स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत नाही का?, असा सवालही नांदगावकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे. वीजबिलांवरुन शरद पवारांनी सरकारला आदेश द्यावा, असंही ते म्हणालेत. सरकारमधल्या पक्षांची ही श्रेयवादाची लढाई असल्याचंही सांगायला नांदगावकर विसरले नाहीत.
वाढीव वीज आल्यानंतर सामान्य माणसानं आत्महत्या करायची का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत वाढीव वीजबिल भरु नका, असं आवाहन मनसेनं नागरिकांना केलं आहे.
भाजपवर कशाला आरोप करता, असं म्हणत नांदगावकर यांनी सरकारला डिवचलं आहे. दरम्यान सध्याची मनसे पक्षाची भूमिका ही एकला चलो रे अशीच आहे. मात्र जनतेसाठीच्या आंदोलनात सामील व्हा, असं आवाहन मनसेनं भाजपला केलं आहे.
Maharashtra Navnirman Sena aggressive rising bill ultimatum Thackeray government
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.