Mumbai News: सागरी महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी मालवाहतुकीत आपल्याचा विक्रम मोडीत काढला आहे. २०२३- २४ या आर्थिक वर्षात ७६ दशलक्ष टन मालवाहतूक जलमार्गाने सागरी महामंडळाने एक नवीन भरारी घेतली आहे. (Latest Marathi NEws)
या मालवाहतुकीतून अंदाजी २१५ कोटींपेक्षा जास्त महसूस राज्य सरकारचा तिजोरीत जमा झाल्याची माहिती सागरी महामंडळाकडून देण्यात आली आहे.(maharashtra Government News)
गेल्या काही वर्षापासून राज्याच्या किनारपट्टी आणि किनारपट्टीच्या पाठीमागील प्रदेशाला आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून जल मार्ग मालवाहतुकीचे चालना देण्याकरिता सागरी महामंडळाने मोठ्या प्रमाणांत बंदरांचा विकास केला आहेत. विशेष म्हणजे जलवाहतूक हा तुलनेने स्वस्त आणि पर्यावरणपूरक मार्ग असल्याने राज्यातील सागर किनाऱ्यावरील जेट्टीचा विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रथमच २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७१ दशलक्ष टन मालवाहतूक जलमार्गाने केली. या मालवाहतुकीतून अंदाजी २०० कोटींचा महसूस राज्य सरकारचा तिजोरीत जमा झाले होते. तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७६ दशलक्ष टन मालवाहतूक जलमार्गाने सागरी महामंडळाने एक नवीन भरारी घेतली आहे. मालवाहतुकीत तब्बल गेल्या आर्थिक ७ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्यात डाहून, बेलापूर, करंजा, दिघी, रत्नागिरी, जयगड, दाभोळ, विजयदुर्ग, वाशी, ट्रोम्बे, बँकॉट सारख्या ५ मालवाहतूक बंदरे आहे. या बंदरातून कोळसा, एलपीजी, एलनजी, सिमेट, साखर, युरिया सारखे अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात जल मार्गाने मालवाहतूक केली जाते.
२०१७-१८ या राज्यातील समुद्र मार्गाने ३७.४ दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. आता २०२३-२४ या आर्थिक वर्षात मालवाहतूक ७६ दशलक्ष टनचा घरात पोहचली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५२ दशलक्ष टन मालवाहतूकीतून केली होती. गेल्या चार वर्षांत २४ दशलक्ष टन जल मार्गाने मालवाहतूक वाढ झाल्या असल्याची माहिती सागरी महामंडळाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.