मुंबई : माझ्या घरचा गणपती दूध प्यायला असे ज्या शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणाले होते, त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी (Shivsena) इतरांना उद्देशून धर्माचे ढोंग (Religion Drama) हा शब्द न वापरणे आणि स्वतःच्या पुरोगामीपणाचे (Progressive drama) ढोल न वाजवणेच चांगले, असा टोला भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी लगावला आहे.
धर्माचे ढोंग करणाऱ्यांना लाथाडणे हेच आमच्या रक्तात आहे, असे प्रबोधनकार लेखसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी म्हणाले होते. आता काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर संसार सुरु केल्यावर मुख्यमंत्र्यांना धर्मविरोधही सुचू लागला आहे. तरीही मधूनच ते हिंदुत्वाकडेही वळतात. ही त्यांची द्विधा मनस्थिती का झाली हे कोणालाही सहज कळू शकेल, असेही लाड यांनी सुनावले आहे.
कित्येक दशकांपासून धर्माचे ढोंग करणाऱ्या ज्या पक्षांवर शिवसेनेने जहरी टीका केली, त्याच पक्षांच्या मांडीला मांडी लावून तीच शिवसेना सत्तेच्या लाचारीपोटी बसली आहे. एकीकडे मधूनच निधर्मीवादाची पिपाणी वाजवायची, शिवसैनिकांनी बाबरी पाडल्याचे दाखले द्यायचे, दंगलीत हिंदूंचे संरक्षण केले अशी उदाहरणे द्यायची आणि दुसरीकडे औरंगाबादचे संभाजीनगर करायला लाजायचे ही कसरत फक्त शिवसेनेलाच जमू शकते, असाही टोला लाड यांनी लगावला आहे.
याने फक्त तुम्हाला टाळ्या मिळतील, पण यामुळे खरा हिंदुवादी तुमच्यापासून दूर गेला आहे हे ध्यानात ठेवावे. किंबहुना गणपती दूध प्यायला असे वक्तव्य शिवसेनेचे मुख्यमंत्री करीत असताना, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मात्र अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे जाहीर विधान केल्याचा दाखलाही लाड यांनी दिला आहे.
इतकी वर्षे देशातील मुस्लिम महिलांना असमानतेची वागणूक देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांबरोबर शिवसेना सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तोंडी घटस्फोट पद्धती रद्द करून त्या महिलांना न्याय मिळवून दिला. या समानतेला इतकी वर्षे विरोध करणाऱ्या पक्षांबरोबर आपण बसलो आहोत, याचे भानही मुख्यमंत्र्यांनी ठेवावे, असेही लाड यांनी सुनावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.